लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत भंडारे राज्यातून दुसरा
By Admin | Updated: April 6, 2015 02:03 IST2015-04-06T02:03:45+5:302015-04-06T02:03:45+5:30
सिद्धार्थ भंडारे अनुसूचित जातीमधून राज्यातून दुसरा .

लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत भंडारे राज्यातून दुसरा
बुलडाणा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच ५ एप्रिल रोजी जाहीर झाला असून, या परीक्षेत डोंगरखंडाळा येथील सिद्धार्थ वसंता भंडारे हा अनुसूचित जातीमधून राज्यातून दुसरा आला आहे. सिद्धार्थ भंडारे याने ९00 पैकी ४२५ गुण प्राप्त केले. सिद्धार्थ भंडारे हा बुलडाणा येथील पोस्ट कार्यालयात पोस्टल असिस्टंट पदावर कार्यरत आहे. येथून जवळच असलेल्या डोंगरखंडाळा येथील अत्यंत गरीब कुटुंबातील सिद्धार्थ भंडारे याने आपले शिक्षण पूर्ण केले. त्याचे आई- वडील शेतमजुरी करून आपल्या कुटुंबांचा उदरनिर्वाह करतात. सिद्धार्थ भंडारे सुरुवातीला शिक्षक लागला. त्यानंतर त्याची पोलीस शिपाई म्हणून नियुक्ती झाली. काही दिवस ही नोकरी केल्यानंतर तो पोस्टल असिस्टंट पदावर नोकरीला लागला. त्यानंतर त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची तयारी केली व या परीक्षेत त्याने ९00 पैकी ४२५ गुण मिळवून अनुसूचित जातीमधून राज्यातून दुसरा येण्याचा बहुमान मिळविला.