शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

मध्यरात्रीपासून एसटीची हंगामी भाडेवाढ; दिवाळीत प्रवाशांच्या खिशाला झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 12:42 IST

खामगाव :  सर्वत्र महागाईची झळ बसत असतानाच, दिवाळीत एसटीचा प्रवासही महागणार आहे. एसटी महामंडळाने दिपावलीच्या कालावधीसाठी तात्पुरती हंगामी भाडेवाढ केली असून १ नोव्हेंबरपासून ही भाडेवाढ लागू होईल.

- अनिल गवई

खामगाव :  सर्वत्र महागाईची झळ बसत असतानाच, दिवाळीत एसटीचा प्रवासही महागणार आहे. एसटी महामंडळाने दिपावलीच्या कालावधीसाठी तात्पुरती हंगामी भाडेवाढ केली असून १ नोव्हेंबरपासून ही भाडेवाढ लागू होईल. परिणामी,  प्रवाशांच्या खिशावर १० ते २० टक्क्यांपर्यत अतिरिक्त भार पडणार असल्याचे दिसते.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून आर्थिक तूट भरून काढण्यासाठी लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या प्रवास भाड्यात अतिरिक्त वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तसे पत्रक देखील एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून सर्व आगारांना पाठविण्यात आहे. त्यानुसार लांब पल्ल्यांच्या गाड्यांसोबतच साध्या आणि निमआराम बसच्या प्रवासासाठी प्रवाशांना अतिरिक्त बोजा सहन करावा लागणार आहे. दरम्यान, दिवाळीनिमित्त बाहेरगावहून येणाºया नोकरदार वर्गासोबतच भाऊबीजेसाठी माहेरी जाणाºया आणि माहेरहून सासरी परतणाºया बहिणींना सुविधा व्हावी, म्हणून एसटी महामंडळाने यावर्षी देखील अतिरिक्त गाड्यांचे नियोजन केले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील सर्वच आगारातून अतिरिक्त बसेस सोडण्यात येतील. यासाठी बुलडाणा राज्य परिवहन महामंडळातर्फे  ३ हजार ७३३ किलोमीटरने जादा नियोजन करण्यात आले आहे. 

 

या कालावधीत होणार भाडेवाढ!

प्रवाशांना दिवाळीपूर्वी आणि दिवाळी नंतर अशा दोन टप्प्यांमध्ये अतिरिक्त भाडेवाढीचा फटका सहन करावा लागेल. ०१ ते २० नोव्हेंबरच्या कालावधीत ही भाडेवाढ लागू असेल.  यामध्ये साध्या बसच्या प्रवास भाड्यात १० टक्के, निम आराम बसच्या प्रवास भाड्यात १५ टक्के तर वातानुकुलित बसच्या प्रवास भाड्यात २० टक्के भाडेवाढ करण्यात येणार आहे.

 

ग्रामीण भागातील प्रवाशांना दिलासा!

अतिरिक्त किलोमीटरचे नियोजन करताना ग्रामीण भागातही दीपावलीच्या कालावधीत फेºया वाढविण्यात येतील. यामध्ये मेहकर आणि बाळापूर मार्गावरील फेºयांचा समावेश राहील. काही ठिकाणी सुरू असलेल्या शटल सेवेच्या फेºयांमध्येही वाढ करण्यात येणार असल्याचे समजते.

 

एसटी कर्मचाºयांच्या सुटी रद्द!

दीपावलीच्या कालावधीत एसटी महामंडळातील सर्व कर्मचाºयांच्या सुटी रद्द करण्यात आल्या आहेत. १ ते २० नोव्हेंबरच्या कालावधीत अति महत्वाचे काम वगळता सुटी घेतल्यास ती सुटी नामंजूर केली जाईल. असे परिपत्रक एसटीच्या सर्वच आगारात धडकले आहे. सर्वच कर्मचाºयांना तशा सूचना देण्यात आल्या आहे. यामध्ये एसटी चालक आणि वाहकांचा प्रामुख्याने समावेश आहे.

आरक्षण स्पेशल गाड्यांमध्येही वाढ!

नोकरदार आणि महिलांची गैरसोय होणार नाही, याची विशेष काळजी महामंडळाकडून दिपावलीच्या कालावधीत घेतली जाईल. यासाठी औरंगाबाद-पुणे यासारख्या लांब पल्ल्याच्या ठिकाणाहून ०१ ते ०६ नोव्हेंबरच्या कालावधीत एसटी महामंडळाकडून खामगाव येथे विशेष आरक्षण स्पेशल गाड्या चालविण्यात येणार आहेत. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाstate transportराज्य परीवहन महामंडळ