शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पाणी टंचाईच्या दाहकतेवर पर्यायी व्यवस्थेचा शोध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 14:54 IST

बुलडाणा: दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या स्थितीचा राज्यस्तरीय पथकाकडून आढावा घेण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या स्थितीचा राज्यस्तरीय पथकाकडून आढावा घेण्यात येत आहे. शुक्रवारी या पथकाने सिंदखेड राजा व देऊळगाव राजा तालुक्यातील काही गावांची पाहणी करून पाणी पुरवठ्याची स्थिती जाणून घेतली. भविष्यातील वाढती पाणीटंचाई लक्षात घेता टंचाईच्या दाहकतेवर पर्यायी व्यवस्थेचा शोध घेण्याला प्रशासनाने आजपासूनच सुरुवात केली आहे.जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस झाल्याने संपूर्ण बुलडाणा जिल्हा दुष्काळाच्या कचाट्यात अडकला आहे. जिल्ह्यातील जलसे्रातांनी तळ गाठल्याने पाणीटंचाईची दाहकता दिवसेंदिवस वाढतच आहे. जिल्ह्यातील मोठ-मोठ्या प्रकल्पांमधील पाणीसाठा खालावला असून, पाणी पुरवठ्याची स्थिती चिंताजनक आहे. प्रशासनाकडून सध्या जिल्ह्यातील ९७ गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यातील पाणीटंचाईचा आढावा घेण्यासाठी राज्यस्तरीय पथक गुरुवारला बुलडाणा येथे दाखल झाले. सुरुवातीला बुलडाणा तालुक्यातील हनवतखेड येथील परिस्थितीची पाहणी केल्यानंतर शुक्रवारी सिंदखेड राजा तालुक्यातील आठ ते दहा गावांमध्ये जाऊन पाणी टंचाईची स्थिती जाणून घेण्यात आली. त्यानंतर या राज्यस्तरीय पथकाने देऊळगाव राजा तालुक्यातील काही गावांमध्ये जाऊन पाणी पुरवठ्याची पाहणी करून ग्रामस्थांशी चर्चा केली. गावामध्ये पाण्याचे टँकर नियमित येते किंवा नाही, विहीर अधिग्रहण केलेल्या ठिकाणी पाणी पुरवठा सुरळीत सुरू आहे किंवा नाही, याची माहिती ग्रामस्थांकडून जाणून घेतली. या पथकामध्ये पाणी पुरवठा विभागाचे अवर सचिव प्र. वि. कानडे, मंत्रालयातील कक्षाधिकारी रेगे, एस. जे. तुमराव, आर. एस. पात्रे यांचा समावेश असून, पाहणी दरम्यान जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग व पंचायत समितीमधील अधिकारी हजर होते. भविष्यातील पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याच्या भीतीने आतापासून विहीर अधिग्रहण, टँकरद्वारे पाणी पुरवठा करणे व इतर पर्यायी सुविधांचा मार्ग शोधण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. वादग्रस्त खडकपूर्णा प्रकल्पाची पाहणीमराठवाड्यात पाणी नेण्यासाठी देऊळगाव राजा तालुक्यातील वादग्रस्त ठरलेल्या खडकपूर्णा प्रकल्पाची पाहणी पाणी पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय पथकाने शुक्रवारी केली. त्याचबरोबर परिसरातील ग्रामस्थांशी या पथकाने चर्चा करून त्यांच्या पाणी समस्या जाणून घेतल्या. राज्यस्तरीय पथकाने खडकपूर्णा प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर सर्वांच्याच नजरा पथकाच्या अहवालाकडे लागल्या आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाwater scarcityपाणी टंचाई