लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : काेराेना महामारीचे संकटत पाहता, मार्च महिन्यांपासून शासनाने शाळा, महाविद्यालये बंद केले हाेते. काेराेनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर, शासनाने ५ ते १२वीपर्यंतच्या शाळा सुरू केल्या आहेत. मात्र, महाविद्यालये बंदच असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेत आहे.
मार्च महिन्यांपासून काेराेनामुळे शाळा महाविद्यालये बंद करण्यात आली हाेती. महाविद्यालयांमध्ये ऑनलाइन अध्यापन सुरू असले, तरी ग्रामीण भागात नेटवर्कची समस्या आहे. त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी त्रस्त झाले आहे. काेराेनाचा प्रभाव कमी झाल्याने शासनाने अनलाॅक प्रक्रियेंतर्गत सुरुवातीला ९ वी ते १२वीपर्यंत शाळा सुरू केल्या हाेत्या. त्यानंतर, २७ जानेवारीपासून ५वी ते ८वी पर्यंतच्या शाळाही सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, महाविद्यालये सुरू करण्याविषयी शासनाने कुठलाच निर्णय घेतला नाही. काेराेनाविषयक नियमांचे पालन करण्याविषयी महाविद्यालयीन विद्यार्थी जागरूक आहेत. मात्र, तरीही शासनाने अद्याप निर्णय घेतलेला नाही.
महाविद्यालये सुरू हाेण्याची प्रतीक्षा
लहान मुलांच्या शाळा सुरू झाल्या. मात्र, महाविद्यालये सुरू करण्यासाठी केवळ चर्चाच सुरू आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान हाेत आहे. अनेक महाविद्यालयांनी ऑनलाइन अध्यापन सुरू केले असले, तरी ग्रामीण भागात नेटवर्कच राहत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेत आहे.
लहान मुलांच्या शाळा शासनाने सुरू केल्या आहेत. मात्र, माेठ्या मुलांचे महाविद्यालये बंदच आहेत. गत ९ महिन्यांपासून महाविद्यालये बंद असल्याने मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे शासनाने महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेण्याची गरज आहे.
पूजा पवार, विद्यार्थीनी
गत ९ महिन्यांपासून केवळ ऑनलाइन क्लास सुरू आहे. अनेक वेळा नेटवर्क राहत नसल्याने अध्ययन व्यवस्थीत हाेत नाही. शासनाने काेराेनाविषयक नियमांचे पालन करून महाविद्यालये सुरू करण्याची गरज आहे. अभ्यासक्रमही मागे पडला आहे.
शेफाली जाधव, विद्यार्थिनी
काेराेनामुळे महाविद्यालये बंदच आहेत. परीक्षाही ऑनलाइन घेण्यात आल्या आहेत. महाविद्यालयात प्रवेश घेऊन एक महिना झाला. मात्र, प्रत्यक्षात महाविद्यालये सुरू झाले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेत आहे. महाविद्यालये सुरू करण्याची गरज आहे.
राेहन खरे
मार्च महिन्यांपासून महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थी घरीच आहेत. शासनाने लहान मुलांच्या शाळा सुरू केल्या असल्या, तरी महाविद्यालये सुरू केले नाही. त्यामुळे शासनाच्या निर्णयाचे आश्चर्य वाटते. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्याची गरज आहे.
अक्षय गाेळे, विद्यार्थी