ट्रकची स्कूल बसला घडक; चार विद्यार्थी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 00:07 IST2017-09-19T00:07:20+5:302017-09-19T00:07:28+5:30
सिंदखेडराजा: येथील जिजामाता विद्यालयाची स्कूल बस १८ सप्टेंबर रोजी ५ वाजता विद्यार्थ्यांना घेऊन सिंदखेडराजावरून माळ सावरगावकडे जात असताना ट्रकने धडक दिल्यामुळे बसमधील चार विद्यार्थी जखमी झाले.

ट्रकची स्कूल बसला घडक; चार विद्यार्थी जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदखेडराजा: येथील जिजामाता विद्यालयाची स्कूल बस १८ सप्टेंबर रोजी ५ वाजता विद्यार्थ्यांना घेऊन सिंदखेडराजावरून माळ सावरगावकडे जात असताना ट्रकने धडक दिल्यामुळे बसमधील चार विद्यार्थी जखमी झाले.
जिजामाता विद्यालयाची स्कूल बस क्रमांक एम.एच.२८ बी.८९३९ हिला मागून येणार्या एम.एच.0४ सी.जी. ९७२४ क्रमांकाच्या ट्रकने जोरात धडक दिली. त्यामुळे बसमधील पूजा बकासरे, राहुल कठोरे, ऋषिकेश कठोरे व अविनाश कठोरे हे चार विद्यार्थी जखमी झाले. या अपघातात बसचा मागील भागाचा चुराडा झाला आहे. पोलीस निरीक्षक बळीराम गीते व त्यांचे सहकारी सुनील खेडेकर, खार्डे, घटनास्थळावर त्वरित दाखल झाले. बसमध्ये ३१ विद्यार्थी होते.