शाळा भरते उघड्यावर

By Admin | Updated: September 22, 2014 00:48 IST2014-09-22T00:26:53+5:302014-09-22T00:48:27+5:30

देऊळगावराजा पंचायत समिती अंतर्गत येणा-या डिग्रस बु. येथील शाळेची दुरवस्था

School Fills Open | शाळा भरते उघड्यावर

शाळा भरते उघड्यावर

डिग्रस बु. (बुलडाणा) : जुन महिन्यात झालेल्या वादळी पावसामुळे येथील मराठी पूर्व माध्यमिक शाळेच्या दोन खोल्यांची टिनपत्रे उडाली होती. तेव्हापासून दोन खोल्यातील वर्ग उघड्यावर भरत आहेत. त्याचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.
देऊळगावराजा पंचायत समिती अंतर्गत येणार्‍या डिग्रस बु. येथील मराठी पूर्व माध्यमिक शाळेच्या दोन खोल्यांचे टिनपत्रे २ जून रोजी झालेल्या वादळी वार्‍यात उडून गेले होते. याबाबत मुख्याध्यापक वाघ यांनी पंचायत समिती देऊळगावराजा येथे लेखी तक्रार िदली होती परंतु पंचायत समितीच्या कोणत्याही अधिकार्‍यांनी भेट दिली नाही. त्यानंतर टिनपत्रे उडाल्याबाबत किसनराव वाघ व शाळा समिती अध्यक्ष भालेराव यांना अर्ज दिला. तसेच माजी सरपंच नवृत्ती रामराव पाटील यांनी अनेकवेळा चौकशी केली. मात्र निधी उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करून उडवा, उडवीची उत्तरे दिली परंतु अद्यापही शाळा खोल्यांवर टिनपत्रे टाकण्यात आली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांंना पावसाचा सामना करावा लागत आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी विद्यार्थी व पालकांनी केली आहे. विशेष म्हणजे शिक्षण विभागाचे सुध्दा याकडे दुर्लक्ष होत आहे.

Web Title: School Fills Open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.