शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

५० हजार शिक्षक भरतीसाठी वेळापत्रक जाहीर; पण नाेंदणी केव्हा सुरू हाेणार?

By संदीप वानखेडे | Updated: July 31, 2023 19:21 IST

शाळांच्या जाहिरातीनंतर सुरू हाेणार पवित्र पाेर्टल : नाेंदणीचा उल्लेखच नाही

संदीप वानखडे

बुलढाणा : राज्य शासन गेल्या काही दिवसांपासून माेठा गाजावाजा करून शिक्षक भरती सुरू हाेणार असल्याच्या घाेषणा करीत आहे. त्यातच शिक्षणमंत्री ना. दीपक केसरकर यांनी शिक्षक भरतीचे वेळापत्रकच जाहीर केले आहे. मात्र यामध्ये विद्यार्थ्यांची नाेंदणी केव्हा सुरू हाेईल, याविषयी कुठलीही माहिती दिलेली नाही, त्यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. १ ऑगस्टपासून नाेंदणी सुरू झाली तरच हे वेळापत्रक लागू हाेण्याची शक्यता आहे.

राज्यभरात शिक्षकांच्या ६० हजारापेक्षा जास्त जागा रिक्त आहेत, ८० टक्के रिक्त जागा भरण्यास वित्त विभागाने मंजुरी दिल्यानंतरही ३० हजार शिक्षकांचीच भरती करण्यासाठी शिक्षणमंत्री ठाम आहे. त्यातच शिक्षण विभागाने कुठलेही नियाेजन न करता आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त केले. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये शिक्षकच नसल्याचे चित्र आहे, त्यातच शिक्षणमंत्री ना. दीपक केसरकर यांनी शिक्षक भरतीचे वेळापत्रक जाहीर केले आहे, यामध्ये सर्वात महत्त्वाचे असलेले विद्यार्थ्यांची नाेंदणी केव्हा सुरू हाेईल याचा उल्लेखच नाही, १५ ऑगस्टपासून पाेर्टलवर जाहिराती येतील, त्यानंतर विद्यार्थी थेट प्राधान्यक्रम देणार असल्याचे शिक्षण मंत्र्यांनी जाहीर केले आहे. मात्र नाेंदणीच नसताना विद्यार्थ्यांना शाळा कशा येतील असा प्रश्न आता उमेदवारांकडून उपस्थित केल्या जात आहेत, त्यातच पाेर्टलवर ३१ जुलैपर्यंत नाेंदणी विषयी कुठल्याही सूचना आल्या नसल्याने संभ्रम वाढला आहे.

एकाच टप्प्यात ५० हजार जागा भरण्याची मागणी

शासनाने पवित्र पाेर्टलच्या माध्यमातून सुरू केलेली २०१७ शिक्षक भरती अद्यापही पूर्ण झालेली नाही, त्यातच घाेषणा १२ हजार रिक्त पदे भरण्याची करण्यात आली हाेती, मात्र प्रत्यक्षात १९६ व्यवस्थापनाच्या जागांची अजूनही प्रक्रिया सुरू आहे, यावर्षी ३० हजार जागा भरण्याची घाेषणा करण्यात आली, प्रत्यक्षात किती जागा भरणार हे पवित्र पाेर्टलवर आलेल्या जाहिरातीनंतर स्पष्ट हाेणार आहे. जागा कमी आल्यास कटऑफही वाढणार आहे.नाेंदणी सुरू करण्याची मागणी

शिक्षक भरतीसाठी लाखाे विद्यार्थी नाेंदणी करणार आहेत, त्यासाठी जवळपास १० ते १५ दिवसांचा वेळ लागणार आहे. त्यामुळे जाहिराती येण्यापूर्वी पवित्र पाेर्टलवर विद्यार्थ्यांची नाेंदणी झालेली असणे आवश्यक आहे. मात्र त्यासाठी पवित्र पाेर्टलवर कुठल्याही सूचना आलेल्या नाहीत, त्यामुळे शिक्षक भरतीची घाेषणा केवळ घाेषणाच ठरू नये, अशी भीती आता उमेदवारांमधून व्यक्त हाेत आहे.

 

टॅग्स :Teacherशिक्षकjobनोकरीbuldhanaबुलडाणा