सिंदखेडराजा येथे दरोडेखोरांचा धुमाकूळ
By Admin | Updated: November 8, 2014 23:41 IST2014-11-08T23:41:43+5:302014-11-08T23:41:43+5:30
एकाच रात्री फोडली चार दुकाने.

सिंदखेडराजा येथे दरोडेखोरांचा धुमाकूळ
सिंदखेडराजा (बुलडाणा): शहरातील चार दुकाने एकाच रात्री फोडून काही ऐवज लंपास केल्याची घटना ८ नोव्हेंबरच्या पुर्वरात्री २.३0 ते ४ वाजेदरम्यान घडली. शहरात दरोडेखोरांच्या धुमाकूळामुळे शहरावासीयांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या संदर्भात माहिती अशी की, शहरातील पोस्ट ऑफिस चौकातील मुख्य मार्केटमध्ये हरीचंद्र शिवलाल चौधरी यांचे बारचे दुकान आहे. त्यांच्या दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी दुकानात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. परंतू, दुकानातील फर्णीचर तोडता न आल्याने चोरटे दुकानात प्रवेश करु शकले नाहीत. याच दुकानाच्या समोर अंबादास डुकरे यांच्या जागेमध्ये भाडेतत्वावर गोविंद मच्छींद्रनाथ किंगरे यांचे जनरल स्टोअर होते. त्या दुकानचे शटर तोडण्याचा चोरटे प्रयत्न करीत असतांना शेजारी असलेले नागरीक जागे झाले. दरम्यान चोरट्यांनी चौकीदार शे. बुर्हाण शे. अमीर याच्या गळ्याला चाकु लावुन घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर स्थानिक बँक ऑफ महाराष्ट्र शाखे समोरील औषधीच्या दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी दुकान उघडले. परंतू, चोरट्यांना तेथेही नगदी रक्कम मिळाली नाही. त्यामुळे चोरट्यांनी औषधीच्या दुकानातून मोर्चा टी पॉईंट जवळील राजेंद्र आढाव यांच्या गॅस एजंन्सीकडे वळविला. गॅस एजंन्सीच्या दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. मात्र, तेथे सी.सी.टिव्ही कॅमेरे दिसून आल्याने चोरट्यांनी सी.सी.टिव्हीचा डाटा बॉक्स किंमत १२ हजार ५00 रुपये व मॉडेम, असा ३ हजार ५00 रुपयाचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी चारही दुकानदारांनी सिंदखेडराजा पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे. दरम्यान, पोलिस निरीक्षक बी.डी. मसराम, उपनिरिक्षक चित्तरवार व जाधव यांनी घटनास्थळीजाऊन पंचनामा केला. पुढील तपास सुरू आहे.