सावखेड तेजन - चिंचोली रस्ता गेला खड्ड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:39 IST2021-09-12T04:39:22+5:302021-09-12T04:39:22+5:30
बुलडाणा / किनगाव राजा : येथून जवळच असलेल्या मेहकर जालना राष्ट्रीय महामार्गालगत सावखेड तेजन ते चिंचोली या मार्गाची ...

सावखेड तेजन - चिंचोली रस्ता गेला खड्ड्यात
बुलडाणा / किनगाव राजा : येथून जवळच असलेल्या मेहकर जालना राष्ट्रीय महामार्गालगत सावखेड तेजन ते चिंचोली या मार्गाची अत्यंत दुरवस्था झाली आहे.रस्त्यावर माेठमाेठे खड्डे असल्याने या त्यावरून वाहने तर दूरच पायी चालणेही कठीण झाले आहे़ या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने वाहन चालकांना अंदाज येत नाही़ त्यामुळे, अपघातात वाढ झाली आहे़
सावखेड तेजन ते चिंचोली जहागीर हा रस्ता पुढे थेट मराठवाडा हद्दीला जोडला जातो़ या रस्त्यावर सावखेड तेजन, हणवतखेड, महारखेड, खामगाव, वाघोरा, सुलजगाव, चिंचोली जहागीर, पुढे पास्टा, सोनदेव शेवली मार्गे वाटूर फाटा राष्ट्रीय महामार्गाला जोडला जातो. अनेकांना रोज बाजारपेठ आणि आपल्या दैनंदिन तसेच सरकारी कामासाठी तहसील कार्यालय,पंचायत समिती, वीज कार्यालय इत्यादी महत्त्वाच्या कामासाठी रोज सिंदखेड राजा येथे येणे-जाणे करावे लागते़ गावामध्ये गंभीर रुग्ण असेल तर उपचाराकरिता तातडीने जालना येथे दवाखान्यात जावे लागते़ परंतु मागील दहा ते पंधरा वर्षांपासून या रस्त्याचे नूतनीकरण करण्यात आले नाही़
ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष
या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे़ मात्र, या मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले़ या रस्त्यावर खड्ड्यामुळे अनेक जणांचा अपघात घडला असून अनेकांना अपंगत्व आले आहे़ त्यामुळे, या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे़
सावखेड तेजन ते चिंचोली जहाँगीर या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत़ अनेक वेळा लोकप्रतिनिधी आणि बांधकाम विभागाला निवेदने दिली आहेत़ हा रस्ता लवकर होणे गरजेचे आहे अन्यथा एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गजानन घुले, भाजपा तालुका अध्यक्ष, सिंदखेड राजा