नांदुरा नगराध्यक्षपदी सविता एकडे, उपाध्यक्ष खराडे अविरोध
By Admin | Updated: August 11, 2015 23:49 IST2015-08-11T23:49:31+5:302015-08-11T23:49:31+5:30
अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी केवळ एक-एक अर्ज दाखल झाल्याने निवड अविरोध.

नांदुरा नगराध्यक्षपदी सविता एकडे, उपाध्यक्ष खराडे अविरोध
नांदुरा (जि. बुलडाणा ) : नगर परिषदेच्या नगराध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी ११ ऑगस्ट रोजी झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी सविताताई राजेश एकडे तर उपाध्यक्ष पदासाठी संतोष खराडे यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची अविरोध निवड झाली. स्थानिक नगर परिषदेच्या सभागृहात ११ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पिठासीन अधिकारी, उपविभागीय अधिकारी दिनेशचंद्र वानखडे यांनी काम पाहिले. प्रत्येकी एकच अर्ज असल्याने यावेळी नगराध्यक्षपदी सविताताई राजेश एकडे तर उपाध्यक्षपदी संतोष खराडे यांची अविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. या घोषणेनंतर सर्मथकांनी नगराध्यक्ष सविताताई एकडे व नगर सेवक राजेश एकडे यांची लाडुतुला करुन प्रचंड आतिषबाजी केली.