सभापतिपदी सत्यभामा डहाके, उपसभापतिपदी कोकिळा परिहार
By Admin | Updated: July 10, 2015 00:02 IST2015-07-10T00:02:22+5:302015-07-10T00:02:22+5:30
चिखली पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती पदासाठी निवडणुक ; अविरोध निवड.

सभापतिपदी सत्यभामा डहाके, उपसभापतिपदी कोकिळा परिहार
चिखली (जि. बुलडाणा): चिखली पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती पदासाठी गुरवारी झालेल्या निवडणुकीत सभापतिपदी सत्यभामा राम डहाके, तर उपसभापतीपदी कोकिळा समाधान परिहार यांची अविरोध निवड करण्यात आली. चिखली पंचायत समितीच्या रिक्त सभापती व उपसभापती पदासाठी समितीच्या सभागृहात ९ जुलै रोजी निवडणूक घेण्यात आली. काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या पंचायत समितीच्या सभापतिपदी सत्यभामा राम डहाके, तर उपसभापतिपदी कोकिळा समाधान परिहार यांची शनिवारी झालेल्या निवडणुकीत अविरोध निवड करण्यात आली. यावेळी सदस्य दयानंद खरात, प्रा. माधुरी देशमुख, लक्ष्मण अंभोरे, प्रसाद देशमुख, भानुदास घुबे, कुशीव्रता इंगळे, विमलबाई लहाने, विनोद खरपास, अमोल पडघान, संगीता पाटील, ज्योती सीताफळे, सविता वाघमारे यांच्यासह नगराध्यक्ष शोभा ताई सवडतकर, जिल्हा परिषद सदस्य अशोक पडघान, अंकुश वाघ, कृषिउत्पन्न बाजार समितीचे सभापती विष्णू पाटील, समाधान सुपेकर, डॉ. स त्येंद्र भुसारी, अरविंद देशमुख, नंदकिशोर सवडतकर, संजय पांढरे, सुधाकरराव धमक, प्रकाश भुतेकर, दीपक देशमाने, राम डहाके, रमेश सुरडकर, राम जाधव आदींची उपस्थिती होती.