सरपंचाचा आत्मदहनाचा प्रयत्न
By Admin | Updated: January 7, 2016 02:18 IST2016-01-07T02:18:12+5:302016-01-07T02:18:12+5:30
अवैध वीटभट्या विरूद्ध कारवाईची मागणी.

सरपंचाचा आत्मदहनाचा प्रयत्न
नांदुरा (जि. बुलडाणा): तालुक्यातील चांदूरबिस्वा येथील ज्या वीटभट्टय़ा अवैध असतील, त्या बंद कराव्यात, अशी मागणी सरपंचांनी केली होती. त्याबाबत माहिती देऊनही कारवाई होत नसल्याने सरपंचाने स्वत:च्या अंगावर रॉकेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चांदूरबिस्वा येथील सरपंच नईमखाँ जिलानीखाँ यांनी तलाठी देवराज सोनाजी जवरे यांच्या कार्यालयात जाऊन वीटभट्टय़ांसाठए दिलेल्या अर्जावर काय कारवाई केली, याबाबत विचारणा केली. त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याने त्यांनी सोबत आणलेली रॉकेलची कॅनमधून अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. सरकारी कामात अडथळा आणल्याची तक्रार याप्रकरणी तलाठी जवरे यांनी पोलिसांत दिली.