२२ गावांतील सरपंचपदाचे आरक्षण आज निघणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:05 IST2021-03-04T05:05:52+5:302021-03-04T05:05:52+5:30
त्यामुळे आता अनेकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. ४ मार्च रोजी ही आरक्षण सोडत होणार आहे. जिल्ह्यातील ५२७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका ...

२२ गावांतील सरपंचपदाचे आरक्षण आज निघणार
त्यामुळे आता अनेकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. ४ मार्च रोजी ही आरक्षण सोडत होणार आहे.
जिल्ह्यातील ५२७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका १५ जानेवारी रोजी झाल्या होत्या. त्यानंतर १८ जानेवारीला निकाल लागला होता. ९ ते ११ फेब्रुवारीदरम्यान यापैकी जवळपास ४९३ ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच निवडण्यात आले होते. मात्र, त्याउपरही जिल्ह्यातील ३३ ग्रामपंचायतींच्या सरपंचांची संबंधित आरक्षणाचा सदस्य नसल्यामुळे निवड होवू शकली नव्हती. त्यामुळे यासंदर्भात गुंता निर्माण झाला होता. आता यापैकी २२ ठिकाणची आरक्षण सोडत ४ मार्च रोजी होत आहे.
--या गावांचा आहे समावेश--
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात दुपारी १२ वाजता हे आरक्षण ठरणार आहे. यामध्ये जवळा बाजार, माळेगाव गौड, आलमपूर (नांदुरा), पुन्हई, कोथळी, अंत्री, टाकळी, वाघजाळ (मोताळा), वरवट खंडेराव, पातुर्डा खुर्द, रुधाना, तामगाव, आलेवाडी ( संग्रामपूर), अरेगाव (मेहकर), वरखेड (मलकापूर), भोगावती, दिवठाणा, (चिखली), आडोल बुद्रुक, वडशिंगी (जळगाव), अजीसपूर (बुलडाणा), पिंपरखेड (सी.राजा) गोत्रा (लोणार), गवंढाळा (खामगाव) या ग्रामपंचायतींचा समावेश आहे