कोथळी येथील सरपंच, उपसरपंचावर अविश्वास ठराव पारित
By Admin | Updated: April 17, 2017 00:38 IST2017-04-17T00:38:12+5:302017-04-17T00:38:12+5:30
मोताळा: तालुक्यातील कोथळी ग्रामपंचायतीच्या सरपंच सीमा महेंद्र जाधव व उपसरपंच वंदना ज्ञानेश्वर राजगुरे यांच्याविरुद्ध दाखल झालेला अविश्वास ठराव शनिवारी बहुमताने पारित झाला.

कोथळी येथील सरपंच, उपसरपंचावर अविश्वास ठराव पारित
मोताळा: तालुक्यातील कोथळी ग्रामपंचायतीच्या सरपंच सीमा महेंद्र जाधव व उपसरपंच वंदना ज्ञानेश्वर राजगुरे यांच्याविरुद्ध दाखल झालेला अविश्वास ठराव शनिवारी बहुमताने पारित झाला. तेरा पैकी नऊ सदस्यांनी हात उंचावून अविश्वास ठरावाच्या बाजून मतदान केल्यामुळे सरपंच व उपसरपंचाला पदावरून पायउतार व्हावे लागले. १५ एप्रिल रोजी ग्रामपंचायतमध्ये आयोजित या अविश्वास सभेच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार रूपेश खंदारे होते.
तेरा सदस्य संख्या असलेल्या कोथळी ग्रामपंचायतीचे सरपंच सीमा जाधव व उपसरपंच वंदना राजगुरे हे सदस्यांना विश्वासात घेत नाही व मनमानी कारभार करतात या व इतर कारणांवरून ग्रा. पं. सदस्य प्रशांत उत्तम वाघोदे, भास्कर कौतिकराव तायडे, गोपाळ सुधाकर पाटील, शेख शकील शे. शरीफ व अरविंद वामन महाकाळ या पाच सदस्यांनी ११ एप्रिल रोजी तहसीलदार खंदारे यांच्याकडे सरपंच व उपसरपंचाविरुद्ध प्रस्ताव दाखल करून अविश्वास दर्शविला होता. या अविश्वास प्रस्तावावर आज १५ एप्रिल रोजी कोथळी ग्रा.पं. कार्यालयात विशेष सभा बोलावून चर्चा करण्यात आली. यावेळी तहसीलदार तथा अध्याशी अधिकारी यांनी ठरावावर मतदान घेतले असता, ठराव दाखल करणाऱ्या पाच व इतर चार असे नऊ सदस्यांनी हात उंचावून अविश्वासाच्या ठरावाच्या बाजूने सहमती दर्शविल्याने तहसीलदार रूपेश खंदारे यांनी सरपंच व उपसरपंचावरील अविश्वास प्रस्ताव पारित केल्याचे घोषित केले. अविश्वास ठरावाच्या बाजूने भास्कर तायडे, गोपाळ पाटील, अरविंद महाकाळ, पौर्णिमा वाघोदे, प्रशांत वाघोदे, कमल इंगळे, विद्या गावंडे, शे. शकील शे. शरीफ व एैनुरबी लुकमानशा या नऊ ग्रा. पं. सदस्यांनी मतदान केले. तर यास्मीनबी शे. सलीम, शे. सलीम शे. हासम या दोन सदस्यांसह सरपंच व उपसरपंच गैरहजर राहिले.