तांदुळवाडी येथील सरपंच अपघातात ठार

By Admin | Updated: January 11, 2015 00:21 IST2015-01-11T00:21:33+5:302015-01-11T00:21:33+5:30

मलकापूर तालुक्यातील अपघात

A sarpanch killed in Tangalwadi accident | तांदुळवाडी येथील सरपंच अपघातात ठार

तांदुळवाडी येथील सरपंच अपघातात ठार

मलकापूर : भरधाव ट्रकने मोटारसायकलला धडक दिल्याने तांदुळवाडी येथील सरपंच सोपान बोरले जागीच ठार झाले. ही घटना दसरखेडनजीकच्या बिरला कॉटसीनसमोर आज शनिवारी सकाळी ११ वाजता घडली.
तांदुळवाडी गावचे सरपंच सोपान निनू बोरले हे हिरो होंडा दुचाकी क्र.एम.एच.२८-जी.२0५३ ने मजुरांना शेतात सोडून घराकडे परत येत असताना मुंबईकडून नागपूरकडे भरधाव जात असलेल्या ट्रक क्र.डब्ल्यू. बी. २३ १२६१ च्या चालकाने सोपान बोरले यांच्या दुचाकीस पाठीमागून जबर धडक दिली. या धडकेत बोरले हे रस्त्याच्या डाब्या बाजूला फेकल्या गेले त्यांच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यांच्या पाठीमागे बसलेले जयंत केशव खाचणे हे दुसर्‍या बाजूला फेकल्या गेल्याने ते बालंबाल बचावले.

Web Title: A sarpanch killed in Tangalwadi accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.