ह्यवृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरेह्ण: जिल्ह्यातील विविध वन पर्यटनस्थळांवर चित्रीकरणबुलडाणा : वने, पर्यावरण, सर्प, वाघ आदी वन्यजीवांचे महत्व पटवून त्यांचेसंवर्धन होण्यासाठी मेहकर येथील महिला सर्पमित्र वनिता बोराडे यांची धडपडसुरू आहे. त्या वन व वन्यप्राण्यांचे महत्व पटवून देणारे ह्यवृक्षवल्लीआम्हा सायरे वनचरेह्ण अशी चित्रफित तयार करित असून त्यासाठी जिल्ह्यातीलविविध वन व पर्यटनस्थळावर त्या चित्रीकरण करित आहेत.वने, वन्यजीव, पर्यावरण, सर्प, वाघ आदींचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठीमेहकर येथील सर्पमित्र वनिता बोराडे यांनी एक वेगळा उपक्रम हाती घेतलाआहे. वनिता बोराडे ह्या ह्यवृक्षवल्ली आम्हा सायरे वनचरेह्ण अशी एक मालिकातयार करित असून, या माध्यमातून पर्यावरण व साप वाचवा, पशू-पक्षी व जंगलवाचवा याचे महत्व पटविण्यात येणार आहे. तसेच सापांविषयीचे गैरसमज नष्टकरून भिती व अंधश्रद्धा दुर करण्यासाठी जिल्ह्यातील विविध वन वपर्यटनस्थळावर चित्रीकरण करण्यात येत आहे. या चित्रीकरणाला संगीतकारपं.ह्रदयनाथ मंगेशकर यांचे संगीत आहे. सर्पमित्र डी.भास्कर यांनी यासंपूर्ण चित्रीकरणाचे लेखन केले आहे. या लेखनातून त्यांनी वन्यजीव बचावप्रसंगाचे वर्णन केलेले असून सापाविषयींचे गैरसमज यावरही प्रकाश टाकलाआहे. हिवरा आश्रम येथे संगीतकार ह्रदयनाथ मंगेशक यांच्या भावसागर याकार्यक्रमातून वृक्षवल्ली आम्हा सायरे वनचरेचा शुभारंभ करण्यात आला.
वन्यजीवांच्या संवर्धनासाठी सर्पमित्र महिलेची धडपड!
By admin | Updated: April 3, 2017 13:47 IST