युवा स्वाभिमानच्या तालुकाध्यक्षपदी संतोष दराडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:23 IST2021-06-24T04:23:47+5:302021-06-24T04:23:47+5:30
युवा जिल्हाध्यक्षपदी काचकुरे बुलडाणा : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या बुलडाणा युवा जिल्हाध्यक्षपदी तुषार मोहन काचकुरे यांची निवड करण्यात आली ...

युवा स्वाभिमानच्या तालुकाध्यक्षपदी संतोष दराडे
युवा जिल्हाध्यक्षपदी काचकुरे
बुलडाणा : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या बुलडाणा युवा जिल्हाध्यक्षपदी तुषार मोहन काचकुरे यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या अकोला विभागस्तरीय बैठकीत ही नियुक्ती करण्यात आली आहे.
योग मनशांती व निरोगी जीवनासाठी उत्तम मार्ग : संचेती
बुलडाणा : योग मनशांती व निरोगी जीवनासाठी उत्तम मार्ग आहे, असे मत डॉ. सौरभ संचेती यांनी केले. ते कृषीसमृद्धी फौंडेशनच्यावतीने सुंदरखेड येथे २१ जूनरोजी आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी नीतेश थिगळे, डॉ. अजितसिंह सायर, प्रवीण चिंचोळकर, अनंत कुलकर्णी यांच्याहस्ते उपस्थित सर्व प्रशिक्षणार्थींना सहभागी प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाला संतोष साखरे, निवृत्ती शेडगे, अक्षय शेळके, अनिता सोभागे, मनीषा बोर्डे, प्रतिभा भुतेकर आदींची उपस्थिती होती.
पावसाची दडी, पेरणी संकटात
डोणगाव : परिसरात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप पेरणी संकटात सापडली आहे. डोणगावसह, आंध्रुड, लोणी गवळी, ऊमरा देशमुख, शहापूर या भागात अनेक शेतकऱ्यांनी सुरुवातीला झालेल्या पावसावर पेरणी केली आहे. परंतु नंतर पावसाने दडी मारली.
प्रत्येकाने लसीकरण करून घ्यावे
लोणार : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी, प्रत्येकाने लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन नगरसेवक डॉ. अनिल मापारी यांनी केले आहे. आता कोरोना लसीकरणाची व्याप्ती वाढविण्यात आली असून, लोणार येथील ग्रामीण रुग्णालयात सध्या लसीकरण सुरू आहे.