संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:04 IST2021-02-18T05:04:07+5:302021-02-18T05:04:07+5:30

संत सावता माळी रयत आठवडे बाजार सुरू लाेणार : तालुक्यातील भुमराळा येथे संत सावता माळी रयत आठवडे बाजार कृषी ...

Sant Sewalal Maharaj Jayanti in excitement | संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात

संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात

संत सावता माळी रयत आठवडे बाजार सुरू

लाेणार : तालुक्यातील भुमराळा येथे संत सावता माळी रयत आठवडे बाजार कृषी विभाग व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आला आहे. गत तीन आठवड्यापासून हा बाजार सुरू असून शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळत आहे.

गुडमाॅर्निंग पथक, स्वच्छता समिती कागदावर

किनगाव राजा : परिसरात गत काही दिवसापासून गुडमाॅर्निंग पथक कार्यान्वित नसल्याने उघड्यावरच शाैच करण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच स्वच्छता समित्याही कागदावरच असल्याचे चित्र आहे. अनेक ग्रामस्थांनी शाैचालयाचे बांधकाम केले असले तरी त्याचा वापर हाेत नसल्याचे चित्र आहे.

राहेरी पुलाचे बांधकाम तातडीने करा

दुसरबीड : सिंदखेडराजा तालुक्यातील राहेरी येथील पुलासाठी सहा काेटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. या पुलाचे बांधकाम तातडीने करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.

बैलजाेडीसह दाेन गायी चाेरी, गुन्हा दाखल

चिखली : तालुक्यातील गाेद्री येथील गाेठ्याचे कुलूप ताेडून अज्ञात चाेरट्यांनी दाेन गायी, दाेन बैल लंपास केल्याची घटना १५ फेब्रुवारी राेजी उघडकीस आली आहे. राजू सुखदेव मुळे यांचे या घटनेमुळे हजाराे रूपयांचे नुकसान झाले आहे.

Web Title: Sant Sewalal Maharaj Jayanti in excitement