भुमराळा येथे संत सावता माळी रयत आठवडी बाजाराला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:32 IST2021-02-14T04:32:20+5:302021-02-14T04:32:20+5:30
या बाजारामध्ये फळ, भाजीपाला आणि शुद्ध गीर गाईच्या पनीर व तूप विक्री होत आहे. या बाजारामध्ये २० ते २५ ...

भुमराळा येथे संत सावता माळी रयत आठवडी बाजाराला सुरुवात
या बाजारामध्ये फळ, भाजीपाला आणि शुद्ध गीर गाईच्या पनीर व तूप विक्री होत आहे. या बाजारामध्ये २० ते २५ क्विंटल भाजीपाल्याची विक्री होत आहे. गावात बाजार उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांनी गावातील लोकांना गावातच ताजा भाजीपाला उपलब्ध होत असल्यामुळे समस्त गावकऱ्यांनी कृषी विभागाचे आभार मानले आहे. हा बाजार सतत सुरू राहण्यासाठी भाजीपाला विक्रेत्यांना बाजार शेड आणि ओटे बांधण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. हा बाजार नव्याने सुरू होण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कावरखे, कृषी पर्यवेक्षक जाधव, कृषी सहायक शिंगणे भुमराळा, आत्मासमन्वयक बुरेवार, कृषी सहायक राजीव शिरसाट, कृषिमित्र तथा ग्राम कार्यकर्ता आदर्शगाव एल. टी. टेकाळे भुमराळा, सरपंच स्वाती वाघमारे, ग्रा. प. भुमराळा माजी सरपंच जनार्दन सरकटे, पोलीस पाटील रंगनाथ कुलकर्णी, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.