संत चोखमेळा जन्मोत्सव सोहळा साधेपणाने साजरा हाेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:28 IST2021-01-14T04:28:37+5:302021-01-14T04:28:37+5:30
देऊळगाव राजा (बुलडाणा): संत चोखमेळा जन्मोत्सव सोहळ्याचे दरवर्षी जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजन करण्यात येत असते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या ...

संत चोखमेळा जन्मोत्सव सोहळा साधेपणाने साजरा हाेणार
देऊळगाव राजा (बुलडाणा): संत चोखमेळा जन्मोत्सव सोहळ्याचे दरवर्षी जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजन करण्यात येत असते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा हा सोहळा साधेपणाने व निवडक लोकांच्या उपस्थितीत साजरा करण्याचे निर्देश पंचायत समिती प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. या वर्षी आज, गुरुवारी सकाळी सात वाजता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या हस्ते महापूजा होणार आहे.
यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी बुलडाणा यांनी आदेश दिल्याप्रमाणे फक्त २० लोकांच्या उपस्थितीत महापूजेला परवानगी मिळाली आहे. तसेच मेहुणा राजा येथील ग्रामपंचायतीची निवडणूक असल्याने आदर्श आचारसंहिताचे पालन करणे बंधनकारक आहे. गर्दी टाळण्यासाठी पालखी, स्वागत समारंभ, महाप्रसाद व इतर सर्व कार्यक्रम रद्द ठेवण्यात आले आहेत. सदर कार्यक्रमास संत चोखामेळा भक्तांनी गर्दी न करू नये... जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन करावे असे आवाहन गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे, गटशिक्षण अधिकारी दादाराव मुसदवाले यांनी केले आहे.
पालकमंत्र्यांनी घेतले दर्शन
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी बुधवारी मेहुणा राजा नगरीला भेट दिली. संत चोखामेळा यांच्या जन्मस्थळी नतमस्तक होत मंत्री डॉ. शिंगणे यांनी मनोभावे दर्शन घेतले. उपस्थित चोखामेळा यांच्या भक्तांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी ग्रामस्थ उपस्थित हाेते.