शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
4
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
5
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
6
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
7
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
8
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
9
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
10
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
11
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
12
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
13
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
14
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
15
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
16
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
17
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
18
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
19
Royal Enfield ने जारी केली यादी; Hunter, Classic, Meteor..; पाहा सर्व गाड्यांची नवी किंमत

सिंदखेडराजा येथे उसळला जनसागर; राजवाड्यावर जिजाऊंची महापूजा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 02:21 IST

सिंदखेडराजा : राष्ट्रमाता माँ जिजाऊ यांच्या ४२0 व्या जयंतीनिमित्त विविध मान्यवरांच्या उपस्थितीत १२ जानेवारी रोजी सकाळी ५.४५ वाजता अभिवादन करण्यात आले. शुक्रवारी सिंदखेडराजा येथील जिजाऊ सृष्टीवर जनसागर उसळला होता.

ठळक मुद्देजिल्हा परिषद, पंचायत समितीच्यावतीने जिजाऊंना अभिवादनग्रामीण भागातही जिजाऊंना अभिवादन

काशीनाथ मेहेत्रे । लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा : राष्ट्रमाता माँ जिजाऊ यांच्या ४२0 व्या जयंतीनिमित्त विविध मान्यवरांच्या उपस्थितीत १२ जानेवारी रोजी सकाळी ५.४५ वाजता अभिवादन करण्यात आले. शुक्रवारी सिंदखेडराजा येथील जिजाऊ सृष्टीवर जनसागर उसळला होता.प्रारंभी सकाळी सूर्योदयापूर्वी राजे लखोजीराव जाधव यांचे सतरावे वंशज गणेशराव राजे जाधव, राजूकाका राजे जाधव, बाळूराजे जाधव, इंजिनिअर अभिजित राजे जाधव, विजय जाधव, बाळासाहेब राजे जाधव, डिगांबर राजे जाधव, संजय राजे, सतीश राजे जाधव, नीलेश भोसले यांनी परिवारासह जिजाऊ मासाहेबांचे पूजन करून पुष्पहार घालून जिजाऊ मासाहेबांना अभिवादन केले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करून ‘जय जिजाऊ, जय शिवराय’च्या घोषणांनी आसमंत दुमदुमला होता.

यावेळी  मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेडच्यावतीने जिजाऊ मासाहेबांना जिजाऊ सृष्टीचे व्यवस्थापक सुभाष कोल्हे, अर्चना कोल्हे, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विजय घोंगरे, वंदना घोंगरे यांनी पूजन करून अभिवादन केले. जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष डॉ. रेखा चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष माधुरी भदाने, जिल्हा अध्यक्ष वनिता अरबट, तहसीलदार सुनील शेळके व त्यांच्या धर्मपत्नी जिल्हा परिषद सदस्य जयश्री शेळके, अँड.अतुल हाडे, अँड. राजेंद्र ठोसरे, महेश पवारसह असंख्य पदाधिकार्‍यांनी जिजाऊंचे पूजन करून अभिवादन केले.तर नगरपालिकेच्यावतीने नगराध्यक्ष अँड.नाझेर काझी व उपाध्यक्ष सीमा शेवाळे यांनी जिजाऊ मासाहेबांची महापूजा केली. मंगलमय वाद्याच्या गजरात, गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी व ‘जय जिजाऊ, जय शिवाजी’ असा जयघोष करीत महापूजा संपन्न झाली. यावेळी देवीदास ठाकरे, डॉ. दत्तात्रय बुरकुल, मुख्याधिकारी धनश्री शिंदे, बाबासाहेब जाधव, बबन म्हस्के, द्रौपदीबाई ठाकरे यांनी पूजा केली. राजेंद्र अंभोरे, डॉ. मुरलीधर शेवाळे, विजय तायडे, हरिश्‍चंद्र चौधरी, सुधाकर चौधरी, गफ्फारभाई, भगवान सातपुते, सिद्धार्थ जाधव, सुधाकर चौधरी, दिलीप आढावसह नगर परिषदेचे सदस्य, कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते. तसेच सिंदखेडराजा परिसरात विविध ठिकाणी माँ जिजाऊ यांच्या प्रतिमेस अभिवादन करून विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्यावतीने जिजाऊंना अभिवादनराष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने जिजाऊंना अभिवादन करण्यात आले. पंचायत समितीमधून ढोल-ताशांच्या गजरात सर्वांना भगवे फेटे बांधून जिजाऊंचा जयघोष करीत सदर रॅली राजवाड्यात सकाळी ७ वाजता पोहोचली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उमा तायडे, उपाध्यक्ष मंगला रायपुरे, मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस., जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रमोद यंडोले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील मेसरे यांच्यासह सभापती राजू ठोके, उपसभापती दीपा जाधव, गटशिक्षणाधिकारी दादाराव मुसदवाले, सर्व जि.प., पं.स. सदस्य संवर्ग विकास अधिकारी सुळे यांच्या हस्ते जिजाऊंचे पूजन करून जिजाऊंना अभिवादन करण्यात आले. 

ग्रामीण भागातही जिजाऊंना अभिवादनबुलडाणा तालुक्यातील ग्रामीण भागातही माँ जिजाऊंना अभिवादन करण्यात आले. यावेळी हतेडी, बिरसिंगपूर, देऊळघाट, डोंगरखंडाळा, पाडळी, भादोला, कोलवड, सागवन आदी ठिकाणी शाळेतील मुलांनी रॅली काढून माँ जिजाऊंचा जयघोष केला. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात उपस्थितांनी मनोगत व्यक्त केले.

टॅग्स :Jijau Janmotsavजिजाऊ जन्मोस्तवSindkhed Rajaसिंदखेड राजा