शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

संजय कुटेंना संभाव्य विस्तारीत मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2019 20:31 IST

-नानासाहेब कांडलकर  जळगाव जामोद : राज्य मंत्रिमंडळाचा १६ जूनला विस्तार होणार असून त्यामध्ये आ. डॉ. संजय कुटे यांचा समावेश ...

-नानासाहेब कांडलकर जळगाव जामोद : राज्य मंत्रिमंडळाचा १६ जूनला विस्तार होणार असून त्यामध्ये आ. डॉ. संजय कुटे यांचा समावेश असल्याचे संकेत मिळाले आहेत. शनिवारी दुपारी त्यांना राजभवनातून तसा फोन आला असून, मुंबईला शपथविधीसाठी ते रवाना झाले आहेत. शनिवार १५ रोजी दुपारी १२.१५ वा. आ. डॉ. संजय कुटे यांना राज्यपालांच्या कार्यालयातून फोन आला आणि १६ जूनला सकाळी ११ वा. मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी राजभवनात उपस्थित राहण्यासंबंधी सांगण्यात आले. विशेष म्हणजे यावेळी आ. डॉ. संजय कुटे जळगाव नगर परिषदेत नगराध्यक्ष, नगरसेवक व मुख्याधिकारी यांच्यासमवेत नगरपालिकेच्या कामकाजाविषयी व नगरातील विविध विकास कामांबाबत चर्चा करीत होते.फोन आल्यानंतर त्यांना चर्चा आटोपती घेत ते निवासस्थानी पोहचले आणि ही सुखद बातमी वा-यासारखी पसरताच त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी व स्नेहीजनांनी शुभेच्छा देण्यासाठी एकच गर्दी केली. सर्वांच्या शुभेच्छांचा स्विकार करीत आ.कुटे हे मुख्यमंत्र्यांनी १५ जूनला रात्री १० वा. वर्षा बंगल्यावर बोलाविलेल्या बैठकीसाठी दुपारी २.३० वाजता जळगाव जामोदवरून औरंगाबाद व तेथून विमानाने मुंबईकरीता रवाना झाले. जनतेच्या आशिर्वादामुळेच मंत्रीपद स्वातंत्र्य प्राप्तीनंतर जळगाव जामोद मतदार संघाला प्रथमच मंत्रीपदाचा मान मिळत आहे. याबद्दल त्यांची भावना जाणून घेतली असता ते म्हणाले. जनतेच्या आशिर्वादानेच मला हा सन्मान मिळाला आहे. बुलडाणा जिल्ह्याच्या विकासासाठी मी आणखी प्रयत्न करेल.जळगाव मतदार संघातील जनतेने माझ्यावर जे प्रेम केले त्याचेच हे फलीत आहे. भाऊसाहेबांच्या आठवणीने आ.कुटे गहिवरले स्व.भाऊसाहेब फुंडकर यांनी मला राजकीय जीवनात आणले. परंतु आज ते नाहीत. त्यांचे नसणे हे माझ्यासाठी वेदनाकारी आहे. असे म्हणत आ.डॉ.संजय कुटे यांचे डोळे पाणावले. क्षणभर थांबुन डोळे पुसत त्यांनी मला मिळालेल्या या संधीचा महाराष्ट्रातील जनतेसाठी उपयोग करून घेईल, असे नम्रपणे सांगितले. यावेळी त्यांचे पिताश्री श्रीरामजी कुटे व धर्मपत्नी डॉ.अपर्णाताई कुटे व मुलगा शंतनु व अभिषेक यांनी ही आपल्या भावना व्यक्त केल्या. आई उमाताई शिर्डी येथे साईबाबांच्या चरणी आ.डॉ.संजय कुटे यांच्या मातोश्री उमाताई कुटे या शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी गेल्या आहेत. विशेष म्हणजे शनिवारी त्या साईबाबांच्या मंदिरात असतानाच त्यांना आपला मुलगा हा मंत्री झाल्याची गोड बातमी कळाली. आणि त्यांनी साई बाबा चरणी संकल्प पूर्ण झाल्याचा विडा ठेवला. वैद्यकीय व्यावसायिक ते मंत्री नगरातील माळीखेलमध्ये वैद्यकीय व्यवसायाला डॉ.संजय कुटे यांनी सुरूवात केली.गुरूकुंज (मोझरी) जि.अमरावती येथे त्यांनी बी.ए.एम.एस. ची पदवी प्राप्त केली आणि त्यानंतर नगरातील माळीखेल भागात आपल्या वैद्यकीय व्यवसायाला सुरूवात केली हे करीत असतानाच त्या ‘प्रोपर्टी’मध्ये उडी घेतली आहे. शेती खरेदी करून प्लॉटिंगचा व्यवसाय सुरू केला. त्यामध्ये त्यांनी चांगले यश मिळाल्यानंतर त्यांच्या राजकीय आकांक्षा पल्लवीत झाल्या आणि ते प्रथमच भाजपाचे तालुका अध्यक्ष बनले. त्यानंतर सन २००४ च्या विधानसभा निवडणुकीत भाऊसाहेब फुंडकरांच्या माध्यमातून तिकीट मिळवून ते प्रथम आमदार झालेत. त्यानंतर त्यांचा राजकीय आलेख चढतच गेला आणि थेट मंत्रीपदापर्यंत पोहोचले.

टॅग्स :buldhanaबुलडाणा