शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

संग्रामपूर : न्यायालयाचे कुलुप तोडून साहित्य लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 11:33 AM

चोरट्यांनी न्यायालयाचे कुलुप तोडून इमारतीत प्रवेश करून आतील साहित्य लंपास केले.

लोकमत न्युज नेटवर्क वरवटबकाल, ता. संग्रामपूर: तामगाव पोलिसांच्या निष्क्रियतेचा फटका १९ मार्चरोजी रात्री न्याय मंदिरालाच बसला. गेल्या कित्येक महिन्यापासुन संग्रामपुर परिसरात चोरत्यानी मंदिरे टारगेट केले असताना आज रात्रि त्यानी चक्क न्याय मंदिराच फोडले. १९  मार्चच्या रात्री जवळपास दोन वाजेच्या सुमारास चोरट्यांनी न्यायालयाचे कुलुप तोडून इमारतीत प्रवेश करून आतील साहित्य लंपास केले. नागरिकांनी पोलिसांना फोन करून माहिती दिली तरी पोलिस वेळेत पोहचले नाहीत. गेल्या कित्येक महिन्यापासुन संग्रामपुर परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. गुरुवारी रात्री चोरट्यांनी न्यायालयात चोरी केली. याठिकाणी चौकीदार नसल्याने कुलूप तोडून चोरट्यानी आत प्रवेश  केला. दरम्यान आवाज आल्याने शेजारील काही नागरिक जागे झाले त्यांनी तामगाव पोलिसांना फोन करून माहिती दिली असता पोलिसांनी गाड़ी पाठवितो, अस उत्तर मिळाले. जवळपास अर्धा तास चोरटे न्यायालय इमारतीत होते पण पोलिस न आल्याने परत अर्ध्या तासाने नागरिकांनी पोलिसांना फोन केला असता परत तेच उत्तर मिळाले. एक तासानंतर ही पोलिस न आल्याने शेजारील नागरिकांनी न्यायाधिशांना फोन करून माहिती दिली. तो पर्यन्त चोरट्यांनी हात साफ केला होता. त्यानंतर चोर्टयांनी पंचायत समितीतील निवासी संकुलाकडे वळविला आणि तेथील दोन घरात चोरी करुन जवळपास २ ते ३ लाखाचा ऐवज चोरुन तेथून त्यानी पळ काढला. तोपर्यंत न्यायाधिश महोदय न्यायालयात पोहचले. त्यांनी पोलिसांनी फोन केला. पोलिस उशिरा पोहचले. तोपर्यंत चोरटे पसार झाले होते.  जवळपास १ तास न्यायालय परिसरात चोर असताना पोलिसांनी धाव घेतली असती तर कदाचित इतर ठिकाणी चोरी झाली नसती. तामगाव पोलिसांच्या निष्क्रीयतेचा फटका बसत असताना पोलिस अधिक्षक मात्र काहीही करायला तयार नसल्याचे दिसून येते. या भागात नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :Sangrampurसंग्रामपूरCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय