शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

संग्रामपूर नगरपंचायत पर्यवेक्षकास लाच घेताना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 1:35 AM

खामगाव(जि.बुलडाणा):  स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत भाडेतत्त्वावर लावण्यात आलेल्या जेसीबीचे २१ हजार २५३ रुपयांचे भाडे देण्यासाठी २ हजार रुपयांची लाच मागणा-या संग्रामपूर नगर पंचायतीच्या प्रभारी सहायक खरेदी पर्यवेक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रविवारी संग्रामपूर नगर पंचायतीच्या आवारात रंगेहात अटक केली.

ठळक मुद्देवाहन भाड्यासाठी मागितली होती लाच!

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव(जि.बुलडाणा):  स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत भाडेतत्त्वावर लावण्यात आलेल्या जेसीबीचे २१ हजार २५३ रुपयांचे भाडे देण्यासाठी २ हजार रुपयांची लाच मागणा-या संग्रामपूर नगर पंचायतीच्या प्रभारी सहायक खरेदी पर्यवेक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रविवारी संग्रामपूर नगर पंचायतीच्या आवारात रंगेहात अटक केली.नंदलाल छगन राठोड (३९) असे लाच घेणा-या व अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मूळचा तो अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी येथील रहिवासी असून, सध्या शेगाव येथील रोकडिया नगरमध्ये राहतो. दरम्यान, मूळ पदस्थापनेवर तो खामगाव पालिकेत कार्यरत असून, संग्रामपूर येथील अतिरिक्त पदभार त्याच्याकडे होता.संग्रामपूर नगर पंचायत अंतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत एकाने शहरातील स्वच्छतेची कामे करण्यासाठी भाडेतत्त्वावर जेसीबी लावले होते. त्याच्या मोबदल्याचा २१ हजार २५३ रुपयांचा धनादेश काढण्यासाठी नंदलाल राठोड यांनी संबंधिताकडे २ हजार रुपयांची लाच मागितली होती. धनादेश देत एक हजार रुपयांचे बक्षीसही त्याने घेतले होते. त्यानंतर १८ मार्च रोजी नगर पंचायतीमध्ये १ हजार रुपये घेऊन येण्याबाबत तक्रारकर्त्यास सांगितले होते. प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १८ मार्चला सापळा रचून नंदलाल छगन राठोड यास १ हजार रुपयांची लाच संग्रामपूर नगर पंचायत कार्यालय परिसरात स्वीकारताना रंगेहात पकडले. प्रकरणी त्याच्या विरोधात बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आपल्या लोकसेवक पदाचा व्यक्तिगत आर्थिक लाभ मिळविण्यासाठी गैरवापर केल्या प्रकरणी (गैरवर्तन) भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ प्रमाणे पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, पोलीस उपअधीक्षक शैलेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एस. बी. भाईक व सहकाºयांनी सापळा रचून नंदलाल राठोड यास अटक केली. या कारवाईत पथकातील संजय शेळके, विजय वारूळे, विजय मेहेत्रे, जगदीश पवार, मधुकर रगड व अन्य सहका-यांनी सहभाग घेतला होता.

टॅग्स :buldhanaबुलडाणा