जऊळका येथील सरपंचपदी सांगळे कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:38 IST2021-09-05T04:38:49+5:302021-09-05T04:38:49+5:30

जऊळका ग्रामपंचायतच्या सरपंच द्वारकाबाई प्रभाकर सांगळे यांच्या विरुध्द उपसरपंच नामदेव बुधवत यांच्यासह ग्रा.प. सदस्यांनी ३० जुलै रोजी अविश्वास ठराव ...

Sangale remains as Sarpanch of Jaulka | जऊळका येथील सरपंचपदी सांगळे कायम

जऊळका येथील सरपंचपदी सांगळे कायम

जऊळका ग्रामपंचायतच्या सरपंच द्वारकाबाई प्रभाकर सांगळे यांच्या विरुध्द उपसरपंच नामदेव बुधवत यांच्यासह ग्रा.प. सदस्यांनी ३० जुलै रोजी अविश्वास ठराव दाखल केला होता. त्यावरुन सिंदखेडराजा तहसिलदार सुनील सावंत यांनी अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी ४ ऑगस्ट रोजी ग्रा.प. कार्यालय जऊळका येथे सभेचे आयोजन करून सदस्यांचे गुप्त मतदान घेतले. सरपंच ह्या २०१७ मध्ये जनतेतून निवडून आल्या होत्या. त्यानुषंगाने तहसिलदार सुनील सावंत यांनी २ सप्टेंबर रोजी ग्रामसभेचे आयोजन करुन गुप्त मतदान घेतले. दरम्यान, सरपंच द्वारकाबाई सांगळे यांना २३७ मते मिळाली. त्यांच्या विरोधात ६७ मते होती. १०५ मतदान हे अवैध झाले. या निवडणुकीत एकूण ५०९ मतदान झाले होते. जनतेने निवडून दिलेले सरपंच जनतेनेच कायम ठेवले. निवडणुकीदरम्यान तहसिलदार सुनील सावंत, नायब तहसिलदार तथा अध्यासी अधिकारी प्रवीण लटके, आर. एस. घुगे, एस. एस. गायकवाड, जे. एस. शिपे, तलाठी वाय. एच. घरजाळे यांची उपस्थिती होती.

पोलीस बंदोबस्तात निवडणूक

निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी ठाणेदार युवराज रबडे पोउपनी बनसोड, अनिल खार्डे, जाकेर पठाण, अरुन माडे, शिवा बारगजे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

Web Title: Sangale remains as Sarpanch of Jaulka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.