रेतीची विनापरवाना वाहतूक
By Admin | Updated: February 14, 2015 01:49 IST2015-02-14T01:49:01+5:302015-02-14T01:49:01+5:30
मेहकर तालुक्यात तीन वाहनांवर कारवाई; २८ हजार रुपये दंड वसूल.

रेतीची विनापरवाना वाहतूक
मेहकर (जि. बुलडाणा) : रेतीची विनापरवाना वाहतूक करणार्या ३ वाहनांवर १२ फेब्रुवारी रोजी महसूल विभागाने कारवाई करुन २८ हजार रुपये दंड वसूल केला आहे. तालुक्यात गत काही दिवसांपासून रेतीची विनापरवाना वाहतूक सुरु आहे. महसूल बुडवून अवैधरीत्या रेतीची वाहतूक सुरु असल्याने महसूल विभागाचा दरमहा लाखो रुपये महसूल बुडत आहे. दरम्यान मंडळ अधिकारी रामराव चव्हाण, तलाठी विजेंद्र धोंडगे, मुकेश काळे, बाठे, गारोळे यांनी भागवत पांडुरंग देवकर रा. नागझरी यांचे एम.एच.२८ डी.६६६३ क्रमांकाचे ट्रॅक्टर पकडून त्यांना ९ हजार ५00 रुपये दंड केला आहे. तर छगन नामदेव गाडे रा.कल्याणा ट्रॅक्टर क्रमांक एम.एच.२८ टी.९२६४ यांना ९ हजार ५00 रुपये दंड व गणेश केशव देशमुख रा.देवठाणा यांचे टाटा ४0७ क्रमांक एम.एच.१९- १५६८ याला ९ हजार ५00 रुपये असे एकूण २८ हजार ५00 रुपये दंड आकारण्यात आला आहे. या कारवाईमुळे विना परवाना रेतीची वाहतूक करणार्यांचे धाबे दणाणले आहे.