कुंबेफळ येथे एकाच रात्री दाेन ठिकाणी चाेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:46 IST2021-06-16T04:46:27+5:302021-06-16T04:46:27+5:30

डोमरूळ : येथून जवळच असलेल्या कुंबेफळ येथे १३ जूनच्या रात्री चाेरट्यांनी हैदाेस घातला़ दाेन ठिकाणी चाेरी करून एका ...

The same night at Kumbephal | कुंबेफळ येथे एकाच रात्री दाेन ठिकाणी चाेरी

कुंबेफळ येथे एकाच रात्री दाेन ठिकाणी चाेरी

डोमरूळ : येथून जवळच असलेल्या कुंबेफळ येथे १३ जूनच्या रात्री चाेरट्यांनी हैदाेस घातला़ दाेन ठिकाणी चाेरी करून एका ठिकाणी चाेरट्यांचा प्रयत्न फसला़ परिसरात चाेरीच्या घटना वाढल्याने पाेलिसांनी रात्रीची गस्त वाढवण्याची गरज आहे़

कुंबेफळ येथील गौतम बावस्कर यांच्या घराचे कुलूप चाेरट्यांनी तोडण्याचा प्रयत्न केला़ परंतु कस्तुरबाई बावस्कर यांना जाग आल्याने त्यांनी आरडाओरड केली़ ग्रामस्थ एकत्र येण्यापूर्वीच चाेरट्यांनी तेथून पळ काढला़ त्यानंतर जुन्या गावात गजानन वाघ यांच्या घरातील २५ हजार राेख व इतर साहित्य चाेरट्यांनी लंपास केले़ दुसऱ्या दिवशी त्यांनी शाेध घेतला असता सुटकेस बाजूच्या शेतात पडलेली दिसून आली़ शिवानंद वाघ यांच्या घरातून चाेरट्यांनी माेबाइल लंपास केले़ या प्रकरणी गजानन वाघ यांच्या फिर्यादीवरून धाड पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे़

Web Title: The same night at Kumbephal