भाज्यांची मातीमोल भावात विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:33 IST2020-12-29T04:33:06+5:302020-12-29T04:33:06+5:30
बाजारात भाजीपाल्याच्या आवकेवर परिणाम झाला असून, गत सप्ताहाप्रमाणेच पालेभाज्यांचे भाव स्थिर आहेत. कांदा, बटाट्याच्या दरही आता कमी झाले ...

भाज्यांची मातीमोल भावात विक्री
बाजारात भाजीपाल्याच्या आवकेवर परिणाम झाला असून, गत सप्ताहाप्रमाणेच पालेभाज्यांचे भाव स्थिर आहेत. कांदा, बटाट्याच्या दरही आता कमी झाले आहेत. आता बहुतांश भाज्यांचे दर कमी झालेले आहेत. फळबाजारात जवळपास पपई वगळता इतर फळांचे दर चढेच आहेत. पपई २० ते २५ रुपये किलोने विक्री करावी लागत आहे.
फळांची आवक स्थिर
सध्या फळांची आवक स्थिर असली, तरी पपईची आवक वाढली आहे. पपई विक्री केवळ २५ रुपये किलोवर आलेली आहे. सफरचंदाची १०० रुपये प्रतिकिलाे, चिकू ६० रुपये आहे.
बटाट्याचे भाव उतरलेले
बटाट्याचे भाव आता उतरत आहेत. सध्या बटाटे ३० रुपये प्रतिकिलो, गोबी २० रुपये, टमाटे २० रुपये, वांगे २० रुपये, दोडके ३०, कांदा ४०, कोथिंबीर २० रुपये किलो आहे.
भाजीपाल्याचे भाव उतरलेलेच आहेत. कांदे, बटाटेचे भावही आता कमी झाले आहेत. भाज्यांची आवक स्थिर आहे.
- सतीष चौधरी, भाजीविक्रेता
फळांचे भाव वाढलेले आहेत. पपईचे भाव सध्या सर्वांत कमी आहे. इतर आवक स्थिर आहे.
- शेख आसीफ बागवान,
फळविक्रेता