संत्र्यांची मातीमोल भावात विक्री
By Admin | Updated: March 18, 2017 15:39 IST2017-03-18T15:17:40+5:302017-03-18T15:39:24+5:30
वादळामुळे संत्र्यांच्या बागेत सर्व फळे गळून पडल्याने संत्रा उत्पादक शेतकºयांना ते मातीमोल भावात विकण्याची वेळ आली आहे.

संत्र्यांची मातीमोल भावात विक्री
वाशिम : जिल्हयात काही भागात १६ मार्च रोजी अचानक झालेल्या वादळी वारा व पावसामुळे संत्रा पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. वादळामुळे संत्र्यांच्या बागेत सर्व फळे गळून पडल्याने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना ते मातीमोल भावात विकण्याची वेळ आली आहे. अवकाळी पावसामुळे संत्रा पिकांचे नुकसान झालेल्या फळांना शेतकऱ्यांनी बाजारात आणल्यानंतर १० रुपये किलोनेही खरेदीदार न मिळत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान संभवत आहे. बगीच्यातून बाजारात विक्रीसाठी आणलेल्या संत्र्याला लागलेला खर्चही शेतकऱ्यांचा निघत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.