टीईटी प्रमाणपत्र नसलेल्या शिक्षकांचे वेतन होणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 12:44 PM2021-02-06T12:44:05+5:302021-02-06T12:45:03+5:30

Teachers News टीईटी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांपुढे मोठाच प्रश्न उभा राहिला आहे.

Salary of teachers without TET certificate will be stopped | टीईटी प्रमाणपत्र नसलेल्या शिक्षकांचे वेतन होणार बंद

टीईटी प्रमाणपत्र नसलेल्या शिक्षकांचे वेतन होणार बंद

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदुरा : ज्या शिक्षकांकडे टीईटी उत्तीर्णचे प्रमाणपत्र नसेल अशा शिक्षकांचे वेतन स्थगित करण्याचा आदेश शासनाने दिल्यामुळे टीईटी उत्तीर्ण नसलेल्ल्या शिक्षकांपुढे मोठाच प्रश्न उभा राहिला आहे.
प्राथमिक व उच्च प्राथमिक स्तरापर्यंत (इयत्ता पहिली ते इयत्ता आठवी पर्यंत) शिक्षक पदावर दिनांक १३ फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्ती करण्यात आलेल्या शिक्षकास किमान अर्हता दिनांक ३० मार्च २०१९ पर्यंत संपादीत करणे बंधनकारक राहील, असा आदेश देण्यात आला होता. त्यानुसार शिक्षकांच्या सेवा समाप्त कराव्या, असेही निर्देश होते. 
त्यामुळे शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता धारण न करणाऱ्या शिक्षकांची सेवा संबंधित खाजगी शैक्षणिक संस्थांनी यापुढे सुरू ठेवल्यास त्यास १ जानेवारी २०२० पासून शासकीय वेतन अनुदान अनुज्ञेय राहणार नाही, असेही यात नमूद करण्यात आले होते. 

Web Title: Salary of teachers without TET certificate will be stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.