पालिका कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:35 IST2021-02-05T08:35:38+5:302021-02-05T08:35:38+5:30
बुलडाणा : येथील नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना गेल्या दाेन महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्यामुळे हे कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहेत. दोन ...

पालिका कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले
बुलडाणा : येथील नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना गेल्या दाेन महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्यामुळे हे कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहेत. दोन महिन्यांचे थकीत वेतन देण्याची मागणी हाेत आहे. पालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी शासनाकड़ून निधी येतो. तसेच जर निधी आला नसेल तर जमा झालेल्या करातून कर्मचाऱ्यांचे वेतन केले जाते. परंतु, गेल्या दाेन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना वेतनच मिळालेले नाही. पालिकेत नुकतीच पदभरती झाली आहे तर काही कर्मचाऱ्यांना एका विभागातून दुसऱ्या विभागात तसेच एका पदावरून अन्य पदावर पाठविण्यात आले आहे. दुसरीकडे नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे वेतन थकले आहे. दाेन महिन्यांपासून कर्मचारी उधारी करुन खर्च भागवत आहेत. तसेच ज्या कर्मचाऱ्यांनी बॅंकांकडून कर्ज घेतले आहे, त्यांना कर्जाचे हप्ते भरताना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे रखडलेले वेतन तातडीने देण्याची मागणी नगर पालिकेतील कर्मचाऱ्यांनी केली आहे.