सहकार विद्यामंदिरचे सुब्रतो कप फुटबॉल स्पध्रेत यश
By Admin | Updated: August 4, 2016 01:02 IST2016-08-04T01:02:06+5:302016-08-04T01:02:06+5:30
विजेत्या चमूची विभागीय स्तरावर होणा-या स्पर्धेसाठी निवड.

सहकार विद्यामंदिरचे सुब्रतो कप फुटबॉल स्पध्रेत यश
बुलडाणा, दि. ३ : बुलडाणा अर्बन चॅरिटेबल संस्थेंतर्गत कार्यरत असलेल्या सहकार विद्या मंदिर बुलडाणा या सीबीएसई मान्यताप्राप्त शाळेच्या विद्यार्थ्यांंनी राष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात येणार्या सुब्रतो कप फुटबॉल स्पध्रेत जिल्हा पातळीवर यश मिळवित विभागीय स्तरावर दिमाखात प्रवेश निश्चित केला.
जिल्हा स्तरावरील स्पर्धा नुकतीच जिल्हा क्रीडा संकुल बुलडाणा येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये सहकार विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांंनी १७ वर्षाखालील मुले या गटामध्ये विजयङ्म्री प्राप्त केली. पहिल्या फेरीत सहकार विद्या मंदिर संघाने शिवाजी विद्यालय बुलडाणा संघाचा १-0 ने पराभव केला तर उपांत्य फेरीत शारदा ज्ञानपीठ संघाचा देखील २-0 ने पराभव केला. यानंतर अंतिम सामना सहकार विद्या मंदिर व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचा २-0 ने पराभव करून विभागीय स्तरावर आपला प्रवेश निश्चित केला. या स्पध्रेत वरूण चुक्कुलवार याने २ तर पवन सपकाळे याने देखील २ गोल करीत संघाच्या विजयात नेत्रदिपक कामगिरी केली. तसेच १४ वर्षाखालील मुले गटामध्ये सहकार विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाने विजयङ्म्री प्राप्त केली. पहिल्या फेरीत सहकार विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय संघाने इंग्लीश पब्लीक स्कुल बुलडाणा संघाचा ५-0 ने पराभव केला. तर उपात्य फेरीत सहकार विद्या मंदिर सीबीएसई संघाचा देखील ३-२ ने पराभव केला. यानंतर अंतिम सामना सहकार विद्या मंदिर व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाच्या संघाने उर्दू हायस्कूल बुलडाणा यांचा ५-0 ने पराभव करून विभागीय स्तरावर आपला प्रवेश निश्चित केला. या स्पध्रेत पियुष बेदरे याने ५ गोल करीत संघाच्या विजयात नेत्रदिपक कामगिरी केली. सहकार विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांंनी नेहमीच राज्य व राष्ट्रीय स्तरावर शाळेचे व जिल्ह्याचे नाव गौरवांकीत केलेले आहे. सदर विद्यार्थ्यांंनी त्यांच्या यशाचे ङ्म्रेय संस्थेच्या अध्यक्षा, शिक्षकवृंद व प्रशिक्षक जावेद खान यांना दिले आहे.