साहेबांचा ‘नो रिप्लाय’, राकाँ सैरभैर
By Admin | Updated: September 28, 2014 00:24 IST2014-09-28T00:24:50+5:302014-09-28T00:24:50+5:30
डॉ राजेंद्र शिंगणे एवजी रेखाताई खेडेकर यांना राकाँची उमेदवारी.

साहेबांचा ‘नो रिप्लाय’, राकाँ सैरभैर
अशोक इंगळे / सिंदखेडराजा
संपूर्ण बुलडाणा जिल्हय़ात राष्ट्रवादी काँग्रेस सक्षम होती ती फक्त सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघात. आ.डॉ. राजेंद्र शिंगणे यांनाच पक्षाची उमेदवारी मिळेल या आशेवर आजपर्यंंत कार्यकर्ते स्थिर होते; परंतु गेल्या चार दिवसात एकाही कार्यकर्त्यांंशी संपर्क न करता ते जिल्हय़ातून भूमिगत झाले. शेवटी साहेबांचा मोबाईल ह्यनो रिप्लायह्ण येत असल्याने अनेकांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध अर्ज दाखल करून आपापला मार्ग धरला आहे. या प्रकारामुळे बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंधड्या झाल्या.
गेल्या २0 वर्षांंपासून आ.डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या एकहाती सत्ता देऊन मतदारांनी त्यांच्यावर विश्वास टाकला होता. जि.प., पंचायत समितीवर सत्ता मिळवित सर्वच स्तरावर त्यांची सत्ता आहे. प्रत्येक क्षेत्रा त त्यांचा कार्यकर्ता आहे. यावेळी डॉ. शिंगणेकरिता पोषक वातावरण असताना त्यांनी उमेदवारी न घे ता रेखाताई खेडेकर यांना पक्षाची उमेदवारी देऊन त्यांनी मतदारसंघातून बहिर्गमन केले.
ते भाजपावर उभे राहतील, अपक्ष उभे राहतील, अशा वावड्या सकाळपर्यंंत मतदारसंघात होत्या; परंतु कार्यकर्त्यांंना कोणताही आदेश सकाळी ११ पर्यंंंत आला नाही. स्व. गणेश शिंगणे यांच्या धर्म पत्नी गौरी शिंगणे या अपक्ष अर्ज भरतील अशाही अफवांचे पीक जोमात होते; परंतु ३ वाजेपर्यंंत एकही शिंगणे कुटुंबांना अर्ज आला नाही. त्यामुळे रेखाताई खेडेकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचा अधिकृत अर्ज दाखल झाल्यानंतर दे. राजाचे माजी नगराध्यक्ष संतोष खांडेभराड, आत्माराम शेळके, माजी सभापती रियाज खाँ पठाण, वसंतराव मगर यांनी सर्मथकासह अर्ज दाखल केल्याने या पक्षात कुणाचा पायपोस राहिला नाही. डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या एकछत्री कारभारला सुरुंग लागला आहे.
डॉ. राजेंद्र शिंगणे जोपर्यंंंत पक्षात आहेत तोपर्यंंंत आपल्याला भवितव्य नाही म्हणून माजी आमदार तो ताराम कायंदे यांनी काही दिवसांपूर्वी सेनेत प्रवेश केला होता; पण पक्षाच्या वेगळ्या चुली पेटतील हे त्यांनी स्वबळातही पाहिले नसेल. त्यात डॉ. राजेंद्र शिंगणे काय भूमिका येथील याचाही थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे सेनेत येऊनही त्यांच्या हाती भोपळाच मिळणार. त्यांनी साधी उमेदवारी अर्जही दाखल केला नाही. जे काही दिवसापूर्वी उमेदवारीच्या रेसमध्ये होते, ते सर्व बाद होऊन मतदारांसमोर नवीन चेहरे येणार येणार आहेत.
भाजपाने डॉ. गणेश मान्टे यांना रिंगणात उतरवून नव्या समीकरणांची मांडणी केली आहे. यामध्ये मनसेचे विनोद वाघ यांचीही वजाबाकी ठरलेलीच आहे. काँग्रेसने यावेळी प्रदीप नागरे यांच्या रूपाने नवा चेहरा मतदारसंघात दिला आहे त्यामुळे ही निवडणूक अतिशय रंजक झाली आहे.