शिक्षण अधिकारी कार्यालयात सहविचार सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:38 IST2021-08-28T04:38:13+5:302021-08-28T04:38:13+5:30
या सहविचार सभेमध्ये शाळा मान्यता वर्धीत करणे वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण वैद्यकीय देयके यांना त्वरित मंजुरात मिळणेबाबत माध्यमिक ...

शिक्षण अधिकारी कार्यालयात सहविचार सभा
या सहविचार सभेमध्ये शाळा मान्यता वर्धीत करणे वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण वैद्यकीय देयके यांना त्वरित मंजुरात मिळणेबाबत माध्यमिक शाळेची संचमान्यता निर्धारणाबाबत भविष्य निर्वाह निधी पावत्या मिळणेबाबत मुख्याध्यापकाच्या प्रभारी पदास अधिक काळ मान्यता देणेबाबत टीईटी पात्रताधारक उपलब्ध होत नाही. म्हणून टीईटी पात्रतेसाठी नेमलेल्या शिक्षकांची मान्यता थांबवू नये. शिक्षक कर्मचारी यांचे पगार नियमित होणेबाबत तसेच श्री विठ्ठल रुखमाई विद्यालय डोणगाव येथील कर्मचारी यांना २० महिन्यापासून मुख्याध्यापक नसल्याने वेतन रखडले असल्याने शिक्षण अधिकारी यांनी स्वत: वेतन काढावे, अथवा प्रशासक नेमून वेतन काढून कर्मचारी यांची उपासमार थांबवावी, याबाबत शिक्षण अधिकारी प्रकाश मुकुंद याच्या सोबत चर्चा करून समस्या सोडविण्याचे आमदार डॉ. रणजित पाटील यांनी सांगितले. यावेळी शिक्षक परिषदेचे विभागीय सहकार्यवाह राजेंद्र चोथवे कार्यवाह श्रीकृष्ण अवचार, जिल्हा अध्यक्ष अफसर हुसैन, जिल्हा कार्यवाह प्रवीण महाजन व विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते .
270821\new doc 2021-08-27 11.31.30_1.jpg
सहविचार सभेत बोलताना डॉ रणजित पाटील