गिरडा शिवारातून सागवानची लाकडे जप्त

By Admin | Updated: September 27, 2016 03:26 IST2016-09-27T03:26:02+5:302016-09-27T03:26:02+5:30

वन कर्मचा-यांनी सागवानची लाकडे जप्त केली; मात्र आरोपी पळून जाण्यात यशस्वी.

Sagowani's wood was seized from Girgaon Shivar | गिरडा शिवारातून सागवानची लाकडे जप्त

गिरडा शिवारातून सागवानची लाकडे जप्त

बुलडाणा, दि. २६- गिरडा शिवारात अवैधरीत्या सागवान झाडाची कटाई करून, त्याची विल्हेवाट लावत असतानाच वन कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन सागवानची लाकडे जप्त केली. परंतु सागवान लाकडाची तस्करी करणारे पाच ते सहा आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरले आहेत. ही घटना २६ सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता करण्यात आली. गिरडा व पाडळी शिवारात मोठय़ा प्रमाणावर सागवान वृक्षाची झाडे आहेत. या शिवारातून परिपक्व व अपरिपक्व सागवान झाडाची कटाई करून त्यांची सर्रास विल्हेवाट लावण्यात येत होती.

Web Title: Sagowani's wood was seized from Girgaon Shivar