शहरं
Join us  
Trending Stories
1
Brahmos Deal with Vietnam : 'ब्रह्मोस' भारताला आणखी मालामाल करणार, हा छोटासा देश चीनशी टक्कर घेणार; होणार 700 मिलियन डॉलरची डील!
2
"तुम मराठी लोग गंदा है...", घाटकोपरमध्ये पुन्हा मराठी-गुजराती वाद, मनसैनिकांनी काय केलं पाहा...
3
Swami Samartha: आपल्यावर स्वामी कृपा होणार असल्याचे संकेत कसे ओळखावेत? जाणून घ्या!
4
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर शनी देणार 'या' पाच राशींना अक्षय्य धनलाभ आणि कीर्ती!
5
"...म्हणून जाती धर्माचे मुद्दे पुढे केले जात आहेत का?", जयंत पाटलांचा महायुती सरकारला सवाल
6
ट्रम्प टॅरिफ धोरणामुळे अमेरिकेची रिझर्व्ह बँकही चिंतेत; अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी व्यक्त केली मोठी भीती
7
कामाच्या वेळी पायावर पाय ठेवला तरी शिक्षा, मुंबईच्या तरुणाचा भयंकर अनुभव, 60 जणांची सुटका
8
लग्न झालेल्या लोकांना विसरण्याचा आजाराचा जास्त धोका? 'ही' आहेत डिमेंशियाची लक्षणं अन् कारणं
9
"मला मुलगी झाल्याने काही लोक निराश झाले", सोहा अली खानचा खुलासा; म्हणाली, "मी तर..."
10
यूट्युबवर व्हिडीओ पाहून रिक्षाचोरीची 'मास्टरी'! एमकॉम, बी टेक सुशिक्षित चोरट्यांचेही आव्हान
11
भयंकर! ४०० प्रवाशांसह बोट नदीत उलटली, ५० जणांचा मृत्यू, १०० जण बेपत्ता
12
VIDEO: 'सुपर ओव्हर'मध्ये राजस्थानला होती जिंकायची संधी, पण 'फ्री हिट' मिस झाली अन् मॅच गमावली
13
"तुमचे १०० बाप आले तरी..."; गरजला बाळासाहेबांचा 'एआय' आवाज; भारावले शिवसैनिक!
14
रोटी, कपडा और मकान नव्हे; आता हवेत लाइक, व्ह्यूज आणि सबस्क्रायबर
15
"मुस्लीम असून मी हिंदूशी विवाह केल्याने...", आंतरधर्मीय लग्नामुळे १० वर्षांनीही सोहा खानला करावा लागतोय ट्रोलिंगचा सामना
16
नवऱ्याचा काटा काढला अन् बेडवर साप ठेवला, कारण...; बायकोचा विषारी प्लॅन, असा झाला पर्दाफाश
17
सुरेश धस-धनंजय मुंडे आज एकत्र दिसणार?; शिरूर कासारमधील सोहळ्याकडे राज्याचं लक्ष
18
आयपीएलदरम्यान बीसीसीआयची मोठी कारवाई, सहाय्यक प्रशिक्षकांसह तिघांना पदावरून हटवलं!
19
"मी माझी फिल्म बघितली अन्.."; 'सुशीला सुजीत' सिनेमा पाहिल्यावर सोनाली कुलकर्णी काय म्हणाली?

दमदार पावसामुळे बहरली ‘सफेद मुसळी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 16:40 IST

आतापर्यंत झालेला पाऊस ‘सफेद मुसळी’ साठी वरदान ठरत असून यामुळे मुसळी उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

- देवेंद्र ठाकरे लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : बुलडाणा जिल्ह्यात अनेक शेतकरी सफेद मुसळीचे उत्पादन घेतात. परंतु गत ३ वर्षांत पाऊस अत्यल्प पडल्याने मुसळी उत्पादनात घट आली होती. अशा अवस्थेत यावर्षी मात्र चांगला पाऊस पडत आहे. आतापर्यंत झालेला पाऊस ‘सफेद मुसळी’ साठी वरदान ठरत असून यामुळे मुसळी उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.जिल्ह्यातील अनेक शेतकरी आता आधुनिक शेतीकडे वळू लागले आहेत. विशेष करून सातपुडा परिसरात हे प्रमाण वाढले आहे. वनौषधींच्या उत्पादनाचे प्रयोग शेतकरी करीत आहेत. जिल्ह्यात अनेक वर्षांपासून शेतकरी डोंगराळ भागात पांढºया मुसळीची शेती करीत आहेत. हा प्रयोग वनौषधी उत्पादनातून स्थानिकांना रोजगार मिळवून देण्यासाठीही महत्वपूर्ण ठरत आहे.अनेकांनी पारंपरिक पिकांना फाटा देत वनौषधी हा उत्तम पर्याय शोधला आहे. बुलडाणा जिल्ह्यात सातपुडा परिसरात जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील शेतकरी अनेक वर्षांपासून वनौषधी उत्पादनाकडे वळले आहेत. यावर्षीचा पाऊस सफेद मुसळीसाठी फायदेशिर असल्याचे शेतकरी सांगत आहेत. असे असले तरी शासनानेही लक्ष देण्याची मागणी होत आहे.

आरोग्यासाठी महत्वपूर्ण वनौषधी!मुसळी ही आयुर्वेदात आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण वनऔषधी मानली जाते. त्याला परदेशात चांगली मागणी आहे. तथापि, मुसळीच्या अधिक उत्पादनासाठी शेती हाच पर्याय आहे. काही आदिवासी शेतकरी आंतरपीक म्हणूनही मुसळीची लागवड करतात. यावर्षी आपल्याकडे मुसळीसाठी पोषक पाऊस झाल्याचे कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ अनिल गाभणे, फळबाग लागवड तज्ञ शशांक दाते यांनी सांगितले.

अनुदानाअभावी शेतकरी अडचणीत!मुसळीसाठी उत्पादन खर्च मोठा येतो. साधारणपणे एकरी २ लाख रूपये खर्च येतो. निसर्गाने साथ दिली, तरच चांगले उत्पादन होते. गत ५ वर्षांपासून शासनाकडून अनुदानही मिळाले नाही. त्यामुळे अनेक शेतकरी अडचणीत आल्याचेही दिसून येत आहे.

आपल्या जिल्ह्यात जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यात मुसळीचे उत्पादन घेतल्या जाते. जिल्ह्यात सुमारे २०० हेक्टरवर मुसळीची लागवड झाल्याची माहिती आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने परिस्थिती चांगली आहे.- नरेंद्र नाईकजिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी.

सफेद मुसळी हे अनिश्चित स्वरूपाचे पिक आहे. चांगले पिक झाल्यास एकरी ५ लाख रूपयांचे उत्पन्न होते. अन्यथा उत्पादन खर्चही निघत नाही. त्यामुळे शासनाने मुसळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी अनुदान तसेच बाजारपेठेत माल पोहचविण्याबाबत नियोजन करण्याची गरज आहे.- मंगेश धुर्डेशेतकरी, सुनगाव ता. जळगाव

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावagricultureशेतीFarmerशेतकरी