साेन्याची पाेथ लंपास करणाऱ्या चाेरट्यांना पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:22 IST2021-06-30T04:22:36+5:302021-06-30T04:22:36+5:30
धाड : बसमध्ये चढत असलेल्या एका ६५ वर्षीय महिलेच्या गळ्यातील साेन्याची पाेथ चाेरणाऱ्या महिला आणि एका पुरुष चाेरट्यास नागरिकांनी ...

साेन्याची पाेथ लंपास करणाऱ्या चाेरट्यांना पकडले
धाड : बसमध्ये चढत असलेल्या एका ६५ वर्षीय महिलेच्या गळ्यातील साेन्याची पाेथ चाेरणाऱ्या महिला आणि एका पुरुष चाेरट्यास नागरिकांनी रंगेहात पकडून पाेलिसांच्या ताब्यात दिले़ पाेलिसांनी चाेरट्यांकडून लंपास केलेली साेन्याची पाेथ जप्त केली़
साेमवारी (दि. २८) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास येथील बसस्थानकावर केसापूर येथील चिंधाबाई गणपत बोर्डे या आपल्या मुलीसोबत धाडजवळच्या बोदेगाव येथे नातलगांना भेटून आपल्या गावी परत जाण्यासाठी धाड बसस्थानकावर बसची वाट पाहत होत्या़ दरम्यान, बसस्थानकावर शेगाव कन्नड बस (एमएच १४ बीबी २५०५) मध्ये चढताना चिंधाबाई यांच्या गळ्यातील सोन्याची पोत किंमत ५५ हजार रुपये, कुणीतर मागून तोडली़ ही बाब त्यांच्या तत्काळ लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला असता चोरटे पळून जाताना नागरिकांनी त्यांना पकडले़ घटनास्थळी पोलिसांना पाचारण करण्यात आले़ या घटनेत पोलिसांनी आरोपी मंगला सतीश तुमसवंर (रा. हनुमान नगर, बीड), तर अशपाक खाँ उस्मान खाँ पठाण (रा़ किन्होळा) या दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सोन्याची पोत पोलिसांनी ताब्यात घेतली आहे़ आराेपीविरुद्ध पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़
चाेरीच्या घटनांमध्ये वाढ
धाड बसस्थानकावर मागील काळात सोन्याच्या पाेथ, पाकीटमारी, मोबाईल चोरी यांसारख्या अनेक घटना वाढल्या आहेत़ त्यामुळे, पाेलिसांनी या चाेरट्यांचा बंदाेबस्त करण्याची गरज आहे़ धाड बसस्थानकावर पाेलीस बंदाेबस्त वाढविण्याची गरज आहे़