अवकाळी पावसाचा रब्बीला फायदा

By Admin | Updated: November 16, 2014 00:08 IST2014-11-16T00:08:32+5:302014-11-16T00:08:32+5:30

बुलडाणा जिल्ह्यात ३५५ मि.मि.पावसाची नोंद.

Sadly rabbinic advantage | अवकाळी पावसाचा रब्बीला फायदा

अवकाळी पावसाचा रब्बीला फायदा

अमडापूर (बुलडाणा): १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळपासून पावसाने अमडापूर व परिसरात हजेरी लावल्याने शेतकर्‍यांना एकप्रकारे मोठा दिलासा मिळाला आहे व तूर व रब्बी पिकांना या पावसामुळे फायदा होणार असल्याचे चित्र आहे. याबाबत येथील सधन शेतकरी श्याम पठाडे यांनी सांगितले की, लोडशेडींगने त्रस् त झालेल्या शेतकर्‍यांना पावसाने दिलासा दिल्याने तूर, हरभरा, गहू, कांदा व इतर पिकांना झालेल्या पावसामुळे फायदा होणार असून, रब्बी पिकांच्या पेरणीमध्ये वाढ होणार आहे. बुलडाणा जिल्ह्यात १४ जुलै रोजी वादळी वार्‍यासह सर्वदुर पाऊस झाला. जवळपास ३५५.१0 मि.मी.पावसाची नोंद करण्यात आली. जिल्ह्यात तीन ठिकाणी वीज पडून एका शेतकर्‍याचा मृत्यू झाला. तर चार बकर्‍या आणि एक गाय ठार झाली. शुक्रवारी दुपारनंतर जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वार्‍यासह पावसाला सुरूवात झाली. बुलडाणा तालुक्यात ४३ मि.मी., चिखली ९१, देऊळगावराजा ४६, मेहकर २६, लोणार १३.१0, सिंदखेडराजा ४५, मलकापूर ७, मोताळा ४१, नांदुरा ७, खामगाव २२, शेगाव ८, जळगाव जामोद २ तर संग्रमापूर तालुक्यात ४ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली.

Web Title: Sadly rabbinic advantage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.