भक्तीपोटी होतो चपलांचा त्याग
By Admin | Updated: September 26, 2014 00:24 IST2014-09-26T00:19:11+5:302014-09-26T00:24:19+5:30
नवरात्रोत्सवास प्रारंभ : भाविकांच्या उपवासाच्या विविध त-हा.

भक्तीपोटी होतो चपलांचा त्याग
खामगाव : नवदुर्गात्सवात भाविकांच्या ङ्म्रद्धेचे दर्शन सर्वत्र होत असते. ङ्म्रद्धा अन् अंधङ्म्रद्धा यांच्या सीमारेषा अतिशय पुसट असते; मात्र अंधङ्म्रद्धेपोटी नव्हे तर केवळ भक्तीभाव म्हणून उपवास ठेवण्याची परंपरा या उत्सवात परंपरेने आहे. अलीकडच्या काळात मात्र अनेक भाविकांनी नऊ दिवस टोपी घालणे, पादत्राणांचा त्याग करणे, एकाच धान्याचे भोजन घेणे, एकवेळ जेवणे अशा अनेक पद्धतीने आपली ङ्म्रद्धा अधोरेखीत केली. अशा ङ्म्रद्धा अनेकदा टिकेच्याही भाग झाल्यात; मात्र भाविकांनी ङ्म्रद्धेपोटी घेतलेली अशी व्रते आजही कायम आहेत. याबाबत आज खामगाव शहर परिसरात सर्वेक्षण केले असता तब्बल ५९ टक्के लोक या उत्सवाच्या काळात पादत्राणांचा त्याग करून अनवाणी राहतात, हे समोर आले आहे.
या काळात उपवास करणार्या भक्तांची संख्याही मोठी असून, तब्बल ७९ टक्के नागरिक उपवास करतात. तर ३४ टक्के भाविक हे कुठलाही फराळ न करता निरंकार उपवास करतात, हे स्पष्ट झाले आहे. गावागावातील मंदिरांमध्ये दर्शनासाठी जाणार्यांचीही संख्या मोठी असून, सूर्यादयापूर्वी ३५ टक्के भाविक दर्शनासाठी देवीचे मंदिर गाठतात.
** उपवासासोबतच वाईट सवयी सोडाव्यात !
दृष्टांचे निर्दालन करणार्या आदिशक्तीच्या या उत्सवाकडे शुभ पर्वांची सुरूवात म्हणूनही पाहिल्या जाते. या उत्सवात भाविक करीत असलेले उपवास हा श्रद्धेचा मार्ग असून, विविध प्रकारच्या उपवासासोबतच वाईट सवयी सोडण्याचा संकल्प प्रत्येकाने या पर्वात केला पाहिजे. कायम स्वरूपी नव्हे तर या पर्वात व्यसन सोडल्यास मानसिक दबाव निर्माण होऊन, एखाद्या व्यक्तीचे कायमचे व्यसन सुटू शकते. त्यामुळे शक्ती, पावित्र्य आणि श्रद्धेचा त्रिवेणी संगम असलेल्या या उत्सवात तरूणांनी, भक्तांनी, तंबाखू, दारू, गुटखा ही व्यसनं सोडण्याचा संकल्प करावा.