बोरी अडगावात घरफोडी
By Admin | Updated: November 16, 2014 00:06 IST2014-11-16T00:06:31+5:302014-11-16T00:06:31+5:30
चोरट्यांनी दोन घरे व एक किराणा दुकान फोडले, ६९ हजारांचा माल लंपास.
_ns.jpg)
बोरी अडगावात घरफोडी
खामगाव (बुलडाणा) : तालुक्यातील बोरी डगाव येथे १४ नोव्हेंबरला रात्री अज्ञा त चोरट्यांनी दोन घरे व एक किराणा दुकान फोडून ६९ हजारांचा माल लंपास केल्याची घटना घडली. यामध्ये चोरट्यांनी दुचाकीही लंपास केली आहे. बोरीअडगाव येथील शालीग्राम विठ्ठल मेतकर यांचे अडगावात किराणा दुकान असून, १४ नोव्हेंबरच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी किराणा दुकान फोडून २९ हजार रुपये नगदी व त्यांची एम.एच.३0-१२८१ क्रमांकाची अंदाजे किंमत २0 हजारांची दुचाकी चोरून नेली. तर देविदास विठ्ठल वाघमारे यांच्या घरातील नगदी ७ हजार रुपये व ४ हजारांचे सोन्याचे कर्णफूल असा ११ हजारांचा ऐवज चोरला. तर तिसर्या घटनेत दशरथ किसन करंगाळे यांच्या घरातील ९ हजार रुपये असा एकूण ६९ हजारांचा माल घेऊन चोरटे लंपास झाले आहे. ही घटना आज शनिवारी सकाळी उघडकीस आली. उपरोक्त तिघांनीही झालेल्या घटनेची खामगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला तक्रार दिली. घटनास्थळी पोलिसांनी पाहणी करून अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ४५७, ३८0 भादंविप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.