ग्रामीण रुग्णालयाला दहा ऑक्सिजन बेड लवकरच मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:34 IST2021-05-10T04:34:40+5:302021-05-10T04:34:40+5:30

मोताळा : कोरोनाचे रुग्णसंख्या सतत वाढत आहेत. बुलडाणा येथील सरकारी दवाखान्यांमध्ये बाहेरच्या जिल्ह्यातून रुग्ण येत असल्यामुळे त्यावर खूप ताण ...

The rural hospital will soon get ten oxygen beds | ग्रामीण रुग्णालयाला दहा ऑक्सिजन बेड लवकरच मिळणार

ग्रामीण रुग्णालयाला दहा ऑक्सिजन बेड लवकरच मिळणार

मोताळा : कोरोनाचे रुग्णसंख्या सतत वाढत आहेत. बुलडाणा येथील सरकारी दवाखान्यांमध्ये बाहेरच्या जिल्ह्यातून रुग्ण येत असल्यामुळे त्यावर खूप ताण येत आहे. तो कमी करण्यासाठी मोताळा येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये लवकरच दहा ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध करण्यात येईल, असे आमदार संजय गायकवाड यांनी सांगितले.

मोताळा येथे आमदार यांनी गायकवाड यांनी ग्रामीण रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, लसीकरणाचा गोंधळ टाळण्यासाठी स्वतंत्र ॲप तयार करून त्यावर रुग्णांची नोंद करण्यात येईल. जेव्हा आपला नंबर तेव्हाच नागरिकांनी यावे जेणेकरून गैरसोय होणार नाही, त्याचबरोबर सर्वांनी लसीकरण करावे, असेही आवाहन त्यांनी केले. लस घेतल्याने नुकसान होते हा गैरसमज असून, कोरोनाला पराभूत करायचे असेल तर लगेच लस घ्या, असे त्यांनी आवर्जून सांगितले. यावेळी तहसीलदार सोनवणे, ठाणेदार गरुड, नगरपंचायत मुख्याधिकारी वराडे, डॉ. अमोल पाटील तसेच सर्व संबंधित अधिकारी व शिवसेना व युवासेना पदाधिकारी तसेच पत्रकार उपस्थित हाेते.

Web Title: The rural hospital will soon get ten oxygen beds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.