धावत्या कारला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2017 09:14 IST2017-07-02T09:14:18+5:302017-07-02T09:14:18+5:30

चिखली-खामगाव रोडने अकोल्याकडे जाणा-या कारला अचानक आग लागल्याची घटना ३० जून रोजी रात्री ९.३० वाजता वैरागड समोर घडली.

Running car fire | धावत्या कारला आग

धावत्या कारला आग

लोकमत न्यूज नेटवर्क
अमडापूर : चिखली-खामगाव रोडने अकोल्याकडे जाणाऱ्या कारला अचानक आग लागल्याची घटना ३० जून रोजी रात्री ९.३० वाजता वैरागड समोर घडली.
याबाबत चालक राहुल जानराव मुदगल (वय ३२ वर्षे रा.अकोला बाळापूर नाका गुरुदेव नगर) याने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या ताब्यातील फोर्ड फियाट गाडी क्रमांक एम.एच.३० ए एफ २७९३ जालना ते खामगाव रोडने अकोला येथे जात असता, रात्री ९.३० वाजताच्या सुमारास गाडीमध्ये धूर निघून आग लागली. यामध्ये कार पूर्णत: जळून खाक होऊन अंदाजे सहा लाख रु.चे नुकसान झाले. ही गाडी गोपाल श्रीराम गोयनका रा.गोयनका नगर अकोला यांची आहे. कारला अचानक आग लागल्याने अग्निशमन दल व अमडापूर पोलिसांनी आग विजवण्यासाठी मदत केली आहे. यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.

Web Title: Running car fire