जानेफळ येथे नियमांना डावलून गाळेवाटप
By Admin | Updated: December 8, 2014 23:58 IST2014-12-08T23:58:48+5:302014-12-08T23:58:48+5:30
लेखापरीक्षण अहवाल सादर : विविध कार्यकारी सहकारी संस्थेचा गलथान कारभार.

जानेफळ येथे नियमांना डावलून गाळेवाटप
जानेफळ (बुलडाणा) : जानेफळ विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या सन २0१२-१३ या कालावधीचे वैधानिक लेखापरीक्षण पूर्ण होऊन सहायक निबंधकाकडे विशेष अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यामध्ये संस्थेने केलेल्या दुकानांच्या बांधकामात अनियमितता असल्याचे आढळून आले. गाळेवाटपही नियमांना डावलून केल्याने जानेफळ विविध कार्यकारी सहकारी संस्थेचा गलथान कारभार समोर येत आहे.
जानेफळ विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे सन २0१२-१३ कालावधीचे वैधानिक लेखा परीक्षण पूर्ण झाले आहे. त्याचा अहवाल सहायक निबंधक यांच्याकडे सादर करण्यात आला असून, त्यामध्ये सदर बांधकामात अनियमितता झाल्याचे आढळून आले. २७ जून २0१२ च्या ठरावानुसार जानेफळ येथे बांधकाम समिती स्थापन करण्यात आली होती; परंतु बांधकाम समि तीच्या सभेचे इतवृत्त ठेवण्यात आले नाही. त्यानंतर १३ ऑगस्ट २0१२ च्या ठरावानुसार १४ गाळेधारकांकडून २१ लाख ५0 हजार रुपये अनामत रक्कम जमा करण्यात आली होती. त्यांच्यासोबत मात्र गाळेवाटपात कोणत्याही प्रकारचा करारनामा करण्यात आला नाही. तसेच गाळेवाटपाबाबत २७ नोव्हेंबर २0१२ रोजी व २५ डिसेंबर २0१२ रोजी घेण्यात आलेल्या ठरावामध्येही तफावत दिसून येते. अनेकांची अनामत रक्कम घेऊन गाळेवाटपाबाबत झालेल्या ठरावाची प्रत काहींनाच देण्यात आली, तर काही गाळेधारकांना ्नरीतसर पावत्या देण्यात आल्या. त्यामुळे हे गाळे कोणाला मिळणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे तसेच जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था, बुलडाणा) यांच्या आदेशानुसार ज्या अटीस अधीन राहून बांधकामास मंजुरात देण्यात आली, त्या अटी व शर्तींंचे पालन या संस्थेकडून करण्यात आले नाही.