शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई: बुलडाणा जिल्ह्यात एक हजारावर प्रवेश पूर्ण          

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 16:29 IST

आतापर्यंत १ हजार १०८ विद्यार्थ्यांचे शाळेत प्रत्यक्ष प्रवेश घेण्यात आले आहेत.

बुलडाणा: आरटीई २५ टक्के मोफत प्रवेशासाठी पाहिल्या लॉटरीमध्ये जिल्ह्यातील १ हजार ६०९ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती; त्यापैकी आतापर्यंत १ हजार १०८ विद्यार्थ्यांचे शाळेत प्रत्यक्ष प्रवेश घेण्यात आले आहेत. दरम्यान, निवड झालेल्यांपैकी ४४९ विद्यार्थ्यांचे प्रवेश प्रलंबित असून ५२ अर्ज त्रुटीत अडकले आहेत.  आरटीई अंतर्गत बुलडाणा जिल्ह्यात २२० शाळांमध्ये २ हजार ९२९ जागांसाठी आरटीई प्रक्रिया राबविण्यात येत आहे. आर्थिक दुर्बल व मागास घटकातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाचा अधिकार देण्यात आला असून, या विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के मोफत प्रवेश राखीव ठेवण्यात आले आहेत. या प्रवेश प्रक्रियेचा लाभ घेण्यासाठी ५ ते ३० मार्च या कालावधीत पालकांनी आॅनलाइन अर्ज केले. त्यानंतर ९ एप्रिल रोजी लॉटर पद्धतीने विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर करण्यात आली. त्यानंतर ११ एप्रिलपासून प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. यंदा कागदपत्रे पडताळणी समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीकडून खोटे पत्ते दिलेले प्रवेश गुगल मॅपिंगच्या आधाराने रद्द ठरविण्यात येत असल्याने अनेक विद्यार्थी प्रवेशापासून मुकले आहेत. आरटीईत पहिल्या लॉटरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी १ हजार १०८ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले असून, ४४९ विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. निवड झालेल्या पैकी ५२ विद्यार्थ्यांचे अर्ज पडताळणी समितीच्या त्रुटीत अडकले आहेत. उर्वरीत विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण करण्याचे आव्हान शिक्षण विभागापुढे असून, त्यानुसार हालचाली सुरू आहेत.प्रवेशासाठी अवघे चार दिवसआरटीईत पहिल्या लॉटरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी सुरूवातीला ४ मे ची अंतीम मुदत देण्यात आली होती. त्यामध्ये आता १० मे पर्यत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवेश घेण्यासाठी अवघे चार दिवस शिल्लक राहिले आहेत. मुदत वाढीची ४४९ विद्यार्थ्यांना संधीप्रथम फेरीतील लॉटरी लागलेल्या पालकांना प्रवेश घेण्यासाठी १० मे पर्यंत दिलेल्या मुदतवाढीची अंतिम संधी उपलब्ध झाली आहे.  या संधीमध्ये लॉटरी लागलेल्यापैकी व प्रवेश बाकी असलेल्या ४४९ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाRight To Educationशिक्षण हक्क कायदाSchoolशाळा