लेखी आश्वासनामुळे रासपचे जलसमाधी आंदोलन स्थगित !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:39 IST2021-09-12T04:39:51+5:302021-09-12T04:39:51+5:30
राहेरी बु : सिंदखेडराजा तालुक्यातील गारखेड धरण येथील गावठाण क्रमांक ३ चे राहिलेले पुनर्वसन करण्यात यावे, तसेच वस्तीत ...

लेखी आश्वासनामुळे रासपचे जलसमाधी आंदोलन स्थगित !
राहेरी बु :
सिंदखेडराजा तालुक्यातील गारखेड धरण येथील गावठाण क्रमांक ३ चे राहिलेले पुनर्वसन करण्यात यावे, तसेच वस्तीत जाण्याकरता रस्ता तयार करण्याची मागणी रासपचे युवा जिल्हा अध्यक्ष रामप्रसाद गणेश लवकरे यांनी मागील काही दिवसांपूर्वी तहसीलदार सिंदखेडराजा यांना निवेदन देऊन मागणी केली होती. मागणी मान्य न झाल्याने त्यांनी ८ सप्टेंबरपासून जवळच्या धरणामध्ये जलसमाधी आंदोलन सुरू केले होते;
परंतु प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन त्यांना जलसमाधी आंदोलन मागे घेण्यास परावृत्त केले़
यावेळी शासनाच्या वतीने बांधकाम विभागाचे निखिल मेहेत्रे, ग्रामसेवक मेहेत्रे, तलाठी एस. एम. नागलोत, पोलीस कर्मचारी हेड कॉन्स्टेबल अनिल नागरे, भारत ढाकणे व त्यांना आश्वासन पत्र देऊन लवकरच ही समस्या मार्गी लावण्यात येईल, अशी ग्वाही देण्यात आली. त्यामुळे जलसमाधी आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आले आहे, अशी माहिती रासपचे युवा जिल्हाध्यक्ष रामप्रसाद लवकरे यांनी दिली आहे. यावेळी आंदोलनामध्ये रासपचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर आटोळे, रासप युवक अध्यक्ष दीपक आघाव, राधाकिसन इंगळे, गजानन लवकरे, सोपान इंगळे, सुदाम राठोड, मधुकर लवकरे, जगन भिसे, संजय लवकरे, रघुनाथ भिसे, राजू लवकरे, अशोक इंगळे, गणेश राठोड, संदीप इंगळे, आकाश राठोड, राजू राठोड, शेख नजीर शहा, विठ्ठल भिसे, समाधान राठोड, हिम्मत राठोड, संजय राठोड, सतीश राठोड, विकास भिसे, अंकुश लवकरे, प्रकाश भालतोडे, राहुल लवकरे, महादेव इंगळे आदींसह इतर कार्यकर्ते आंदाेलनात सहभागी झाले हाेते़