रोहयोची झाडाझडती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2016 01:58 IST2016-02-27T01:58:46+5:302016-02-27T01:58:46+5:30
राज्यस्तरीय समिती समिती सदस्यांनी व्यक्त केली नाराजी ; शेगाव, खामगाव, मोताळ्यात घेतला आढावा.

रोहयोची झाडाझडती!
बुलडाणा : रोजगार हमी योजनेची राज्यस्तरीय समिती शुक्रवारपासून जिल्ह्यात दाखल झाली आहे. समितीचे अध्यक्ष आमदार जयकुमार रावळ यांच्यासह सोला पूरचे आमदार सुरेश देशमुख, आमदार राहुल बोंद्रे व आमदार डॉ.संजय रायमुलकर यांनी या योजनेतील कामांची आज प्रत्यक्ष पाहणी केली. शेगावातील कामांबाबत प्रचंड नाराजी, मोताळ्यातील अंत्री या गावात कमी लांबीचा रस्ता तर खामगावात मंजूर विहिरींपेक्षा प्रत्यक्ष विहिंरीची संख्या कमी असे विरोधाभासी चित्र या समितीच्या निदर्शनास आले आहे.