शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

चिखलीत सराफा दुकानात चोरी;  आठ लाख ७० हजार रूपयांचा माल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 14:10 IST

चिखली : शहरातील वर्दळीचे ठिकाण असलेल्या राजा टॉवर परिसरातील सराफा लाईनमधील ‘वेदांत ज्वेलर्स’या दुकानात अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा धाडसी चोरी करून सुमारे आठ लाख ७० हजार रूपयांचा माल लंपास केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : शहरातील वर्दळीचे ठिकाण असलेल्या राजा टॉवर परिसरातील सराफा लाईनमधील ‘वेदांत ज्वेलर्स’या दुकानात अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा धाडसी चोरी करून सुमारे आठ लाख ७० हजार रूपयांचा माल लंपास केला आहे. ही घटना २२ जुलैला सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली.सराफा बाजारातील वेदांत ज्वेलर्सचे मालक फिर्यादी अशोक बाळाजी डहाळे (वय ५०) हे नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास आपले दुकान उघडण्यासाठी आले. प्रथम दुकानाचे छोटे शटर उघडून त्यांनी दुकानात प्रवेश केला. त्यानंतर आपल्याजवळ असलेली पिशवी काऊंटरवर ठेवली व कुलुप, किल्ली आतल्या बाजुने ठेवण्यासाठी गेले असता, या संधीचा फायदा घेत तीन अज्ञात व्यक्ती दुकानात आले. त्यांनी तात्काळ काऊंटरवर ठेवलेली थैली उचलून दुचाकीवरून पोबारा केला. अशोक डहाळे यांनी ओरडाओरड केली, मात्र तोपर्यंत चोरटे लंपास होण्यात सफल झाले होते. सदरची संपूर्ण घटना ही सीसी कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली असल्याचे समजते.दरम्यान, चिखली पोलीसांनी अशोक डहाळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. या पिशवीमध्ये ८० हजार रूपये रोख, अडीचशे ग्रॅम सोने अंदाजे किंमत साडेसात लाख रूपये, १ कीलो चांदी अंदाजे किंमत चाळीस हजार रूपये, असा एकूण ८ लाख ७० हजाराचा माल चोरट्यांनी लंपास केला. शहरामध्ये दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण असून आरोपींचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार गुलाबराव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अशोक हुलगे करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाtheftचोरीChikhliचिखली