खामगाव विभागात ३२ कोटींचे रस्ते
By Admin | Updated: November 5, 2015 01:39 IST2015-11-05T01:39:58+5:302015-11-05T01:39:58+5:30
नोव्हेंबरअखेर अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार रस्त्यांच्या कामांना प्रारंभ.

खामगाव विभागात ३२ कोटींचे रस्ते
नीलेश जोशी / खामगाव : जिल्ह्यातील १२00 कि.मी. लांबीचे जिल्हा मार्ग तथा राज्य मार्गाची झालेली दयनीय अवस्था पाहता, अर्थसंकल्पीय तरतुदीमधून खामगाव आणि बुलडाणा विभागामध्ये ७४ कोटी रुपये खर्च करून दीडशे किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचा दर्जा सुधारण्यात येणार आहे. याकामी नाबार्डचेही सहकार्य मिळत आहे. आर्थिक वर्ष निम्मे संपल्यानंतर या कामांना आता मुहूर्त निघाला असून, येत्या महिन्यात ही कामे होत आहेत. बुलडाणा जिल्ह्यात रस्ता अपघातांमध्ये ५00 व्यक्तींचा बळी जात असल्याच्या पार्श्वभूमीवर या रस्ते सुधारण्याच्या कामाला महत्त्व प्राप्त झाले आहे. जिल्ह्यात ६ हजार २५ किलोमीटर लांबीचे रस्ते असून, राष्ट्रीय महामार्ग क्र.६ ची लांबी ८५.७८ कि.मी.आहे. या रस्त्यांची प्रदीर्घ कालापासून दुरुस्ती न झाल्याने रस्त्यांची खस्ता हालत झाली आहे. त्यापार्श्वभूमीवर २0१५-१६ या आर्थिक वर्षात या रस्त्यांचा दर्जा सुधार कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. नोव्हेंबरअखेर प्रत्यक्ष या कामांना प्रारंभ होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.