मेहकर शहरातील रस्त्याचे कामे संथ गतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:52 IST2021-02-23T04:52:25+5:302021-02-23T04:52:25+5:30
गत काही महिन्यांपासून लोणार फाटा ते शहरात येणाऱ्या रस्त्याचे काम सुरू आहे. अत्यंत संथगतीने कामाची सुरुवात होत असून, ...

मेहकर शहरातील रस्त्याचे कामे संथ गतीने
गत काही महिन्यांपासून लोणार फाटा ते शहरात येणाऱ्या रस्त्याचे काम सुरू आहे. अत्यंत संथगतीने कामाची सुरुवात होत असून, रहदारीला मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण झालेला आहे. राज्य परिवहन महामंडळाला संबंधितांनी पत्र देऊन शहरातून जाणाऱ्या एसटी बस गाड्या लोणार फाट्याचे सारंगपूर बायपास सोनाटी चौफुली ते बस स्टॅन्डकडे वळविण्यात यावे, असे पत्रद्वारे सूचना केल्या आहेत. त्यामुळे शहरातून जाणाऱ्या व विविध स्टॉपवरून प्रवासी नेत असलेल्या एसटी बससेवा आता बायपासवरून सुरू झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत. सध्याही या रस्त्यावरून जड वाहतूकही सुरू आहे. केवळ एसटी महामंडळाला पत्र देऊन प्रवाशांना त्रास देण्याचे काम संबंधित विभागाकडून होत असल्याचा आरोप अनेक प्रवाशांनी केलेले आहे. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गंभीरतेने लक्ष देऊन, लोणार फाटा ते माॅ जिजाऊ चौक रस्त्याचे काम लवकर पूर्ण करावे, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.