मेहकर ते अंत्री देशमुख रस्ता झाला अतिक्रमणमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:32 IST2021-02-05T08:32:08+5:302021-02-05T08:32:08+5:30

यावेळी सार्वजनिक बांधकाम, महसूल प्रशासन, नगर परिषद प्रशासन, पोलीस विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मेहकर ते ...

The road from Mehkar to Antri Deshmukh became encroachment free | मेहकर ते अंत्री देशमुख रस्ता झाला अतिक्रमणमुक्त

मेहकर ते अंत्री देशमुख रस्ता झाला अतिक्रमणमुक्त

यावेळी सार्वजनिक बांधकाम, महसूल प्रशासन, नगर परिषद प्रशासन, पोलीस विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मेहकर ते अंत्री देशमुख रस्त्याचे निर्माणकार्य वडारवाडा व रामनगर भागातील अतिक्रमणामुळे गेल्या दोन वर्षांपासून थांबले होते. त्यामुळे हे अतिक्रमण शहरात चर्चेचा विषय झाला होता. अखेर गुरुवारी सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबीच्या साहाय्याने अतिक्रमण काढले. यामध्ये अतिक्रमणात असलेले लोकांचे पक्के बांधकाम, कच्चे बांधकाम, टिनाचे अतिक्रमण असे सर्व प्रकारचे अतिक्रमण जेसीबीच्या साहाय्याने काढण्यात आले. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. या अतिक्रमण हटाव मोहिमेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता सुनील खडसे, अभियंता गुलाब शेळके, नायब तहसीलदार वैशाली जायगुडे, नगर परिषद अभियंता ठाकरे, मापारी, नगर परिषद कर्मचारी धुर्वे, सय्यद अख्तर, विशाल शिरपूरकर, मंडळ अधिकारी चनखोरे, पोलीस उपनिरीक्षक अशोक जायभाये, युवराज रबडे, एपीआय घुले, बीबी, साखरखेर्डा, जानेफळ, डोणगाव येथील पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: The road from Mehkar to Antri Deshmukh became encroachment free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.